अँथनी लोफ्रेडो
sakal_logo

द्वारे

टीम ई सकाळ

जगात वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत. वेगळे दिसण्यासाठी ते काहीही करायला तयार असतात. सुंदर दिसण्याच्या हव्यासापोटी काही लोक प्लॅस्टिक सर्जरी करतात. यामुळे काहींचे सौंदर्य अधिक खुलते तर काही जण विद्रूप दिसायला लागतात. यामुळे त्यांचे करिअर अद्धवस्त होऊन जाते. अशा अनेक घटना आपण पेपरमध्ये वाचतो किंवा टीव्हीत पाहतो. परंतु, एका माणसाने एलियन (Black Alien) बनण्याचा नादात नाक, कान, ओठ, बोटे कापून टाकले.

फ्रान्समधील (France) रहिवासी असलेल्या अँथनी लोफ्रेडो (Anthony Lofredo) (वय ३३) याला खूप पूर्वीपासून एलियन बनण्याचे वेड (Craze) होते. यासाठी त्याने चेहऱ्याचे आवश्यक भाग (Cut His Nose And Body Parts) कापले होते. आता त्याने डाव्या हात विचित्र पंजासारखे दिसावे यासाठी दोन बोटे कापली आहेत. यामुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. यानंतर तो शस्त्रक्रियेसाठी मेक्सिकोला गेला. इतकंच नाही तर अँथनीने एलियन बनण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी शरीरावर काळ्या रंगाचा टॅटू काढून ठेवला आहे.

हेही वाचा: …अन् मध्यरात्री आईला मुलगी प्रियकरासोबत दिसली नको त्या अवस्थेत

अँथनी सुरक्षा रक्षक म्हणून काम करायचा. परंतु, तो खूश नव्हता. कारण, त्याला काळा एलियन व्हायचे होते. एके दिवशी त्याला वाटले की आपण तसे आयुष्य जगत नाही आहो, जसे जगायला पाहिजे. यातूनच त्याने सुरक्षा रक्षकाची नोकरी सोडली आणि ऑस्ट्रेलियाला गेला. आता त्याने स्वतःला बदलायला सुरुवात केली. आता तो पूर्णपणे बदलला आहे. तो आणखी काही शस्त्रक्रिया करणार असल्याची माहिती आहे.

काळा एलियन बनण्याचे स्वप्न

‘ब्लॅक एलियन’ बनण्यासाठी अँथनीने अनेक शस्त्रक्रिया केल्या आहेत. या व्यतिरिक्त त्याने शरीरावर टॅटू काढले आहेत. शरीरावरच नाही तर डोळ्यांवरही काळे टॅटू आहेत. तो अधिक शस्त्रक्रिया करून स्वतः काळा एलियन होणार आहे.

हेही वाचा: काँग्रेसचा स्वबळाचा नारा! शिवसेना, राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष

डोळ्यांच्या आत टॅटू

अँथनीने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तो आपली बोटे कापताना दिसत आहे. त्याचे नाक आणि वरचे ओठ आधीच कापले गेले आहेत. त्याने डोळ्यांत टॅटूही बनवले आहेत.Esakal

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here