
5 तासांपूर्वी
मुंबई : कुणाकुणाला नेहमीच चर्चेत राहायला आवडते. यासाठी ते वाटेल ते करायला तयार असतात. कोणी हे करताना बोल्डनेसची हद्द पार करतात. यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळतेच शिवाय हॉट म्हणून नावही होते. असाच काहीसा फोटोशूट निक्की तांबोळीने (Nikki Tamboli) केला आहे. निक्की तांबोळीने हा फोटोशूट मॅगझिनच्या कव्हर पानासाठी (Magazine Cover Page) केला आहे. फोटोत तिने अंतर्वस्त्र घातलेले नाही, हे विशेष…
बिग बॉस १४ ची स्पर्धक निक्की तांबोळी पुन्हा एकदा बोल्डनेसमुळे चर्चेत आली आहे. निक्कीला बिग बॉस १४ मधून लोकप्रियता मिळाली. शोमध्ये तिचे बेधडक वागणे सर्वांनाच आवडले होते. निक्की नंतर खतरों के खिलाडीमध्ये दिसली होती. आता निक्कीने ब्रालेस फोटोशूट (अंतर्वस्त्र न घालता) केला आहे. हा फोटो (Hot Photo) तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. तिच्या या फोटोमुळे इंटरनेटवर खळबळ उडाली असून, चाहत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तिने हा फोटोशूट एका मॅगझिनच्या कव्हर पानासाठी केला आहे.
हेही वाचा: अजबच इच्छा! एलियन बनण्यासाठी त्याने कापले नाक, कान, ओठ व बोट
निक्की तांबोळीने ब्रालेस फोटोशूट करताना लाईम येलो फॉर्मल कोट पँट व कोट घातलेला आहे. या ओपन कोटमध्ये तिने ब्रालेस लूकमध्ये पोज दिला आहे. तिच्या आउटफिटला संपूर्ण लुक देत तिने गोल्डन कानातले आणि गोल्डन हील्स घातल्या आहेत. ती या फोटोमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. तिच्या फोटोला चाहत्यांकडून खूप कमेंट्स येत आहेत. निक्कीचा हा बोल्ड लूक चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

ग्लॅमरस स्टाईल
फोटो शेअर करताना निक्की लिहिते, ‘जर मी लोकप्रिय आहे तर ती माझी चूक नाही. तुम्हाला माझा हेवा वाटत असेल तर तो माझा दोष नाही’. निक्कीने याआधीही अनेकदा तिची ग्लॅमरस स्टाईल दाखवली आहे. तिचा बिकिनी फोटोही चांगलाच व्हायरल झाला होता. निक्कीने पारंपरिक पोशाखही फॅशनेबल पद्धतीने सादर केले आहेत. यामध्ये तिचा स्टायलिश लुक आणि मेकअप सौंदर्यात आणखीनच भर घालतो.
Esakal