पर्यावरण संरक्षणार्थ सायकलने देश भ्रमंती; रामप्रसाद पोहचला लाखनीत
sakal_logo

द्वारे

अभय भुते

लाखनी (जि. भंडारा) – दिवसेंदिवस होत चाललेला पर्यावरनाचा ह्रास आणि यामुळे उद्भवणारे नैसर्गिक संकट हे कमी व्हावेत यासाठी अनेक निसर्गप्रेमी वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती करत असतात याच प्रमाणे रामप्रसाद नस्कर हा पर्यावरण वाचवण्याचा संदेश घेऊन सायकल ने देशभ्रमान करून लाखनी शहरात पोहचला.

रामप्रसाद ने आतापर्यंत २५००० किमी पेक्षा जास्त सायकल चालवलेली आहे. रामप्रसाद भारत देश सोडून नेपाळ, बांग्लादेश मध्ये सुध्दा आपला संदेश घेऊन पोहचले होते तेथील नागरिकांना ही पर्यावरण वाचवण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल,असे मार्गदर्शन त्यांनी केले. रामप्रसाद हे 2010 पासुन सायकल नेच प्रवास करतात,किंबहुना त्यांनी लग्न झाल्यावर आपल्या बायकोला सायकलनेच घरी आणले होते.

हेही वाचा: समता सैनिक दलाच्या पदाधिकाऱ्याचा खून; चार अल्पवयीन ताब्यात

ते मूळचे कोलकाता चे रहिवासी आहेत तसेच श्रीपुर शिक्षा सदन शाळेत शिक्षक म्हणुन काम करतात. रामप्रसाद यांनी आपली सायकल यात्रा 30 सप्टेंबर महिन्यात. सुरू केली. त्यांनी या अभियानात दहा राज्य पार करत आतापर्यंत 5500 किमी चा प्रवास लाखनी पोहचेपर्यंत केला आहे. तसेच .ते दिवसातुन 180किमी ते 200 किमी पर्यंत सायकल चालवितात.

विशेष म्हणजे शाळेतून सुट्टी घेऊन ते या पर्यावरण हिताच्या कार्यात सहभागी झाले आहेत.,या दिवसात त्यांना कोणताही पगार शाळा देत नाही हा सर्व खर्च स्वतः करतात.त्यांना या मोहिमेलेला 20,000 चा खर्च आला असे त्यांनी सांगितले.ते आता आपल्या पत्नी ला सुध्दा या मोहिमेत सामील करणार असून समोरचे १५०० किमी अंतर ते दोन आठवढ्यात पूर्ण करणार आहेत.



Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here