
5 तासांपूर्वी
रत्नागिरी ः एसटी कर्मचाऱ्यांच्या बंदवर तोडगा काढण्यामागे उच्च व तंत्रशिक्षमंत्री उदय सामंत यांची मध्यस्थी महत्वाची ठरली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शरद पवार, अनिल परब, यांच्याशी गेली आठ दिवस ते बैठकांवर बैठका घेत आहेत. कालपासून देखील ते प्रमुख मंत्री, प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करत होते. अखेर उदय सामंत हे बंदवर तोडगा काढण्यातील प्रमुख हिरो ठरले आहेत.
एसटीचे शासनमध्ये विलिनिकरण करण्यावरून गेली पंधरा दिवस एसटीचा बंद सुरू आहे. यामुळे राज्यात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी खासगी वाहनांना एसटीच्या भाड्यात प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे. एसटीचा बंद मागे घ्यावा, यासाठी सत्ताधारी पक्षातील रथी-महारथी एसटीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. मात्र कोणीही चर्चा करण्यास पुढे येत नव्हते. संप ताणला गेल्यामुळे गेल्या आठ दिवसांपूर्वीच मंत्री उदय सामंत यांनी शासन एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले होते.
हेही वाचा: बापरे! भारत-पाक सामना एवढ्या लोकांनी पाहिला; Viewership चा नवा विक्रम
तेव्हापासून मंत्री सामंत हे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याबरोबर चर्चा करून त्यावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना भेटले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सदाभाऊ खोत आणि गोपिचंद पडळकर यांच्याशी बैठकावर बैठका घेत आहेत. एसटी बंदवर तोडगा काढण्यासाठी त्यांची मध्यस्थी आणि धावपळ फळाला आली आहे. त्यामुळे समितीचा निर्णय होईपर्यंत विलिनिकरणाचा निर्णय सोडून अन्य मागण्या मान्य करून घेण्यात यशस्वी ठरले आहेत.
उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा
परिवहन मंत्री अनिल परब आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबतची बैठक संपवुन सायंकाळी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी एच एन रिलायंन्स हाँस्पिटलमध्ये गेले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी मंत्री अनिल परब आणि उदय सामंत यांची या प्रकरणी विस्तृत चर्चा झाली. त्यानंतर सह्याद्री अतिथीगृहात पत्रकार परिषद घेऊन सरकारची भूमिका मांडली आहे.
Esakal