dhanjay mahadik,satej patil
sakal_logo

द्वारे

टीम इस्का टीम

गडहिंग्लज : निवडणुकीत सतेज पाटील (Satej Patil)यांच्या पाठीशी राहण्याचा शब्द देऊन २४ तास उलटण्यापूर्वीच आज सकाळी माजी खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik)यांनी याच पक्षाच्या काही नगरसेवकांची येथे भेट घेतली. त्यांनी अमल महाडिक यांच्या पाठीशी राहण्याची विनंती केल्याचे सांगण्यात येते.

कालच दुपारी सतेज पाटील गडहिंग्लजला येऊन गेले. माजी आमदार श्रीपतराव शिंदे, नगराध्यक्षा स्वाती कोरी, उपनगराध्यक्ष महेश कोरी, पक्षप्रतोद बसवराज खणगावे यांच्यासह १४ नगरसेवकांची भेट घेतली. जनता दलाकडे १५ नगरसेवक आहेत; परंतु कालच्या भेटीवेळी एक सदस्या गैरहजर होत्या. त्यामुळे त्या नाराज असल्याची कुणकुण लागताच आज सकाळी महाडिक दौऱ्यावर आल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, महाडिक यांनी जनता दलाच्या आणखी काही नगरसेवकांची भेट घेऊन उमेदवार अमल महाडिक यांना मदत करण्याची विनंती केल्याचे सांगण्यात आले. महाडिकांच्या आजच्या दौऱ्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे.

दरम्यान, माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या नेतृत्वाखालील जनता दलाने पाठींबा जाहीर केल्याने माझ्या विजयासाठी आवश्यक २७० या ‘मॅजिक फिगर’चा (Magic Figure) आकडा आज ओलांडला आहे. जनता दलाच्या नगरसेवकांनी दाखवलेला हा विश्‍वास सार्थ ठरवून गडहिंग्लजच्या विकासाला बळ देण्याचा प्रयत्न करु, अशी सतेज पाटील (Satej Patil) ग्वाही यांनी दिली होती. सतेज पाटील यांचा दौरा होताच धनंजय महाडिकही आज गडहिंग्लज दौऱ्यावर गेल्याने चर्चेला आले उधाण आले आहे.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here