कोरोना अपडेट
sakal_logo

द्वारे

मिलिंद तांबे

मुंबई : आज कोरोनाचे 179 नवीन रुग्ण (corona new patients) आढळले असून कालच्या तुलनेत रुग्णसंख्या काहीशी वाढली आहे. कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 7,61,955 वर पोहोचली आहे. आज 162 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 7,40,709 रुग्ण कोरोनामुक्त (corona free patients) झाले आहेत.

हेही वाचा: राज्यात 11 कोटी डोस पूर्ण; लसीकरणात महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानावर

मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या आणखी कमी झाली असून 2364 पर्यंत खाली आली आहे. मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी वाढून  2616 दिवस झाला आहे.मुंबईतील रुग्णसंख्या नियंत्रणात असल्याने पॉझिटिव्हिटी दर देखील 0.03 पर्यंत खाली आला आहे. आज 4 कोविड मृत्यूची नोंद झाल्याने मृतांचा एकूण आकडा 16,319 वर पोहोचला आहे.

बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर 0.03 टक्के झाला आहे. मुंबईत कोविड चाचण्या कालच्या तुलनेत वाढवण्यात आल्या आहेत. आज दिवसभरात 33,108 कोविड चाचण्या केल्या गेल्या असून आतापर्यंत 1,22,65,888 एवढ्या चाचण्या झाल्या आहेत.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here