फसवणूक
sakal_logo

द्वारे

दत्ता लवांडे

जळगाव : सोशल मीडियावरील ओळखीनंतर महिला मुलींची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. अमेरिकेत नोकरीला असल्याचा बनाव करुन एका ठगाने पाचोरा येथील सॅाफ्टवेअर अभियंता तरुणीची २ लाख ५५ हजारांत फसवणूक केली आहे. सायबर पोलिसांत या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

पाचोरा तालुक्यात वास्तव्यास असलेली तरुणी पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करते. मराठी मॅट्रोमनी साइटवर ती वर शोधत होती. त्यासाठी साईटवर तिने आपला प्रोफाइल, मोबाईल नंबरसह अपलोड केला होता. त्याच क्रमांकावरून ४ नोव्हेंबरला निवांत चित्रे असे नाव सांगणाऱ्या तरुणाने तिच्याशी संपर्क केला आणि लग्नाची बोलणीही केली. आपण अमेरिकेतील ग्लासगो येथे राहत असल्याची बतावणी त्याने केली. प्राथमिक बोलणी झाल्यानंतर दोघांचा फोनद्वारे संपर्क वाढला होता. दोघेही ऑनलाईन प्रेमाच्या आणि भावी आयुष्याच्या आणाभाका घेत असतानाच भामट्याने आपला डाव साध्य केला.

हेही वाचा: दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं… “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

लग्नाचा निर्णय झाल्यानंतर त्या तरुणाने तिला भेटवस्तू पाठवत असल्याचे सांगितले. त्यात सोन्याच्या बांगड्या, सोन्याचा हार, डायमंडचे घड्याळ व एक हजार पाऊंड युके चलन ज्याची भारतीय किंमत एक कोटी रुपये आहे, अशा वस्तू पाठवलेल्या आहेत. दिल्ली विमानतळावर कस्टम व जीएसटी शुल्क भरल्याशिवाय ते पार्सल मिळणार नाही,’ असं सांगून संशयिताने ४ नोव्हेंबरपासून ते २३ नोव्हेंबरपर्यंत २ लाख ५५ हजार ५०० रुपये ऑनलाईन घेतले.

पैसे गेल्यावर कळाले

अमेरिकेतील त्या भामट्याला २ लाख ५५ हजार ५०० रुपये पाठवल्यानंतर त्याने पाठवलेल्या एक कोटीच्या डॉलरसह, गिफ्टची वाट ही तरुणी बघत होती. मात्र या काळात ना पार्सल आले ना त्याच्याशी संपर्क झाला. पैसे परत मिळण्याचीही शक्यता नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने सायबर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे अधिक तपास करत आहेत.



Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here