नाशिक खून
sakal_logo

द्वारे

हर्षवर्धन बोऱ्हाडे

नाशिक : शहरात (nashik) गुन्हेगारीच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत. हत्येच्या घटनेनं नाशिक शहर पुन्हा हादरलं आहे. सातपूर परिसरातील भाजपा मंडळ अध्यक्ष अमोल इघे यांची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राजकीय पूर्ववैमनस्यातून हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. अवघ्या ४ दिवसात नाशिक मधील तिसरी हत्या असल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकाराने परिसरात खळबळ माजली आहे. तसेच शहरातील पोलिसांच्या गस्ती बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हत्येचं सत्र सुरूच

काही दिवसांपूर्वी एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. किरकोळ वादातून ही हत्या झाली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला. नाशिकमधील म्हसरूळ आरटीओ ऑफिसजवळ (Mhasrul RTO office Nashik) ही हत्या झाली होती. तर ऐन दिवाळीत एका महिलेची चाकूने वार (knife attack) करुन हत्या केल्याची घटना नाशकात समोर आली होती. मृतक महिलेचं नाव पूजा आंबेकप (Pooja Ambekar) असं होतं. पूजा आंबेकर ही आरपीआयची महिला पदाधिकारी होती. 3 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास पूजाची हत्या करण्यात आली होती.

हेही वाचा: मोदी-योगींच्या ‘त्या’ व्हायरल फोटोचे रहस्य अखेर उलघडले! | Viral Photo

हेही वाचा: पूर्वोत्तर राज्यांना ६.१ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के



Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here