bjp-ध्वज
sakal_logo

द्वारे

नरेश शेंडे

मुंबई : मुंबई महानगर पालिकेतून विधानपरीषदेवर निवडून जाणाऱ्या दोन जगांची निवडणुक 10 डिसेंबर रोजी होणार आहे.या निवडणुकीसाठी भाजपकडून माजी आमदार राजहंस सिंह यांना उमेदवारी मिळाली आहे.या निवडणुकीसाठी भाजपने आज सर्व नगरसेवकांची बैठकही घेतली आहे.

उमेदवार निवडून येण्यासाठी 77 नगरसेवकांची मतं मिळणे आवश्‍यक आहे.तर,भाजपकडे 83 नगरसेवकांचे पाठबळ आहे.त्यामुळे राजहंस सिंह यांचा विजय निश्‍चित मानला जात आहे.मात्र,विधानपरीदषदेसाठी गुप्त मतदान होणार असल्याने त्यात नेहमीच नगरसेवक फुटण्याची शक्यता असते.त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक पक्षांकडून खबरदारी घेऊन रणनिती राबवली जाते.या रणनितीचा भाग म्हणून भाजपच्या नगरसेवकांची आज बैठक झाली.या बैठकीत मतदान बाबत नगरसेवकांना माहिती देण्यात आली.भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांनी दुजोरा दिला.

शिवसेकडून माजी आमदार सुनिल शिंदे मैदानात आहे.शिवसेनेकडे 97 नगरसेवकांचे पाठबळ आहे. त्यामुळे त्यांचा विजयही निश्‍चित मानला जात आहे. कॉंग्रेसचे माजी नगरसेवक सुरेश कोपरकर यांनी या निवडणुकीत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.त्यानंतर कॉंग्रेस वगळता इतर पक्षांची मिळून 48 मतं मिळतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

नगरसेवक फुटू नये म्हणून खेळी

कोपरकर यांना पक्षांकडून उमेदवारी दिलेली नाही.मात्र,कॉंग्रेसचे नगरसेवक शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांना मत देऊ नये यासाठी कोपरकरांना यांना मुद्दामुन निवडणीकीसाठी उभे करण्यात आल्याचे समजते.नगरसेवक फुटणे हे पक्षाच्या प्रतिष्ठेला घातक असल्याने कॉंग्रेसकडून ही खेळी करण्यात आली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here