तामिळनाडूची राजधानी चेन्नईला पावसाने झोडपले आहे. अतिवृष्टीमुळे येथील टी-नगरमध्ये पाणी साचले आहे. पंप लावून साचलेले पाणी बाहेर काढले जात आहे. भारतीय हवामान विभागातर्फे गुरुवारी (ता.२५) तामिळनाडूतील पाच जिल्ह्यांसाठी रेड अर्ल्ट जारी केला आहे.

त्यात तिरुनेलवेली, थूथूकुडी, रामनाथपुरम, पुडुकोटाई आणि नागापट्टीनम या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे.
दुसरीकडे स्थानिक हवामान विभागाने कन्याकुमारी, तिरुनेलवेली आणि थेनकासी या जिल्ह्यांमधील काही भागात वीजेसह अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे.
राज्यातील चेन्नईसह आठ जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.
खराब हवामानामुळे चेन्नई-थिथूकुडी विमान गुरुवारी त्रिची मार्गे वळवण्यात आले होते.
अतिवृष्टीमुळे चेन्नईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here