तेरा वर्षांपूर्वी 26 नोव्हेंबर 2008 साली मुंबईवर 10 दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यावेळी शेकडो निष्पाप जीव वाचवण्यासाठी शौर्याने लढताना, स्वतःचे बलिदान देताना शुरवीरांना राष्ट्राने पाहिले होते. शूर नॅशनल सिक्युरिटी गार्ड कमांडो असो किंवा मुंबई पोलिस उपनिरीक्षक असो, शूर सुरक्षा कर्मचारी, , या सर्वांनी इतरांना वाचवण्यासाठी आपले प्राण धोक्यात टाकून आजपर्यंत शौर्याची ‘मशाल’ तेवत ठेवली आहे.

मेजर संदीप उन्नीकृष्णन (Major Sandeep Unnikrishnan) –
साहसी NSG कमांडो उन्नीकृष्णन यांनी ताज हॉटेलमधील दहशतवाद्यांसह सामना करताना भारतीय सैन्याचे ब्रीदवाक्याप्रमाणे ”स्वत:च्या आधी सेवा’ हे तत्व पाळले. 10 कमांडोच्या टीमसह ते हॉटेलमध्ये प्रवेश केला होता आणि त्याने दहशतवाद्यांना गोळीबारात गुंतवण्यात यश मिळवले होते. ”वर येऊ नका, मी त्यांना संभाळून घेईल” हे मेजर संदीप उन्नीकृष्णन यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना सांगितलेले शेवटचे शब्द ठरले. ताज हॉटेलमध्ये दहशतवाद्यांना गोळीबारामध्ये गुंतवून ठेवताना त्यांना एक गोळी लागली. त्यांच्या या शौर्याला नंतर भारत सरकारने मरोणोत्तर अशोक चक्र प्रदान करून सम्मानित केले.
तुकाराम ओंबळे (Tukaram Omble) –
भारतीय लष्करातील एक निवृत्त सैनिक, आणि मुंबई पोलिसांमध्ये सहाय्यक उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले, तुकाराम ओंबळे यांनी दहशतवादी अजमल कसाबला पकडण्याचे काम केले. 26/11 रोजी ते आणि त्यांची टीम एका चेकपॉईंटवर पाहारा देत असताना, बळकावलेल्या कारामध्ये दोन दहशतवादी त्यांच्या जवळ आले. सुरूवातीस झालेल्या गोळीबारानंतर एक दहशतवाद्यासा कारमध्येच ठार केले तर दुसरा अजमल कसाब आत्मसमर्पणाचे नाटक करीत जमिनीवर पडला. निशस्त्र ओंबळे त्याच्या जवळ येताच कसाब उठला आणि त्याने गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. ओंबळे त्याच्यासमोर उभे राहिले आणि कसाबच्या राईफलचे बॅरल अशाप्रकारे पकडले की, त्यांच्याशिवाय इतर कोणालाच गोळी लागणार नाही. त्यानंतर उर्वरित टीमला कसाबला पकडण्यात यश आले. ओंबळे यांना पॉईंट ब्लॅकरेजमध्ये एके-47मधून 40 गोळ्या लागल्या होत्या, त्यामुळे ते जगू शकले नाही. त्यांच्या असामान्य शौर्याबद्दल सरकारने त्यांना मरणोत्तर अशोक चक्राने सन्मानित केले.
हेमंत करकरे ( Hemant Karkare) –
दक्षिण मुंबईतील कामा रुग्णालयाबाहेर दहशतवाद्यांशी लढताना छातीत तीन गोळ्या लागल्याने दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांचा मृत्यू झाला. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रेबेरो नंतर म्हणाले, “करकरे हे महाराष्ट्रातील सर्वोत्तम पोलीस अधिकाऱ्यांपैकी एक होते आणि ‘भारतातील’ असे म्हणण्याची मी हिंमत करतो.”
अशोक कामठे (Ashok Kamte) –
अशोक कामठे हे मुंबई पोलिसांचे अतिरिक्त आयुक्त म्हणून काम करत होते. 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला तेव्हा ते पूर्व विभागाचे पर्यवेक्षण करत होते. त्याच्या इस्ट झोनवर हल्ला झाला नसला तरीही त्यानी हल्ल्याच्या वेळी मदतीची ऑफर दिली होती. दक्षिण मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेज आणि रंगभवन दरम्यानच्या अरुंद गल्लीत दहशतवाद्यांशी लढताना त्यांनाही आपला जीव गमवावा लागला.

विजय साळसकर( Vijay Salaskar) –
मुंबईतील दहशतवादी हल्ल्यामध्ये ड्युटीदरम्यान, एनकांऊटर स्पेशालिस्ट विजय साळसकर देखील मृत्यूमुखी पडले. ताब्यात घेतलेल्या अजमल कसाबने चौकशीदरम्यान साळसकर यांना मारल्याची कबुली दिली होती. साळसकर हे मृत्यूपूर्वी खंडणी विरोधी कक्षाचे प्रमुख होते. त्यांच्या शौर्याला 26 जानेवारी 2009 साली सरकारने अशोक चक्र देऊन सन्मानित केले.
हवालदार गजेंद्र सिंग ( Hawaldar Gajendra Singh) –
हवालदार गजेंद्र सिंग हे NSG कमांडोच्या टीमचा भाग होते, जी नरिमन पॉईंटच्या छतावर पळ काढलेल्या दहशतवाद्यांच्या मागावर होते ज्यांनी 6 निष्पाप नागरिकांना ओलीस ठेवले होते. ओलिस ठेवलेल्या ठिकाणावरुन दहशतवाद्यांनी हे NSG कमांडोच्या टीमवर गोळीबार सुरु केला होता. कमांडोजवर काही ग्रेनेडही दहशतवाद्यांनी फेकले होते. अखेर हवालदार गजेंद्र सिंग यांच्या बलिदानामुळेच एनएसजी टीमला दहशतवाद्यासह चकमकीत वर्चस्व राखण्यात मदत झाली.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here