नरेंद्र मोदी

मोदी म्हणाले की, भारत एका अशा संकटाकडे वाटचाल करत आहे जो संविधानाला वाहून घेतलेल्या लोकांसाठी चिंतेचा विषय आहे.

sakal_logo

द्वारे

टीम ई सकाळ

संविधान दिनानिमित्त बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, संविधानाच्या माध्यमातून देश पुढे जात आहे. संविधानाची निर्मिती जर आता आपल्याला करावी लागली असती तर त्याचं एक पानही लिहू शकलो असतो का अशी शंका असल्याचं मोदी म्हणाले. मोदींनी घराणेशाहीच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर नाव न घेता निशाणा साधला आहे. तसंच एकाच कुटुंबातले अनेकजण राजकारणात असणं म्हणजे घराणेशाही नव्हे असंही मोदी म्हणाले.

मोदी म्हणाले की, भारत एका अशा संकटाकडे वाटचाल करत आहे जो संविधानाला वाहून घेतलेल्या लोकांसाठी चिंतेचा विषय आहे. तो चिंतेचा विषय म्हणजे देशातील कौटुंबिक पक्ष. राजकीय पक्षांमधील घराणेशाही ही लौकशाही मूल्यांच्या विरोधात आहे. ज्यांनी लोकशाही मूल्ये गमावली आहेत ते लोकशाहीचं संरक्षण कसं करू शकतील असा सवलासुद्धा मोदींनी यावेळी विचारला.

घराणेशाही असलेले पक्ष म्हणजे एकाच कुटुंबातल्या अनेक लोकांनी राजकारणात येऊ नये असं म्हणत नाही. योग्यतेच्या आधारे, जनतेच्या आशीर्वादाने एका कुटुंबातील अनेक लोक राजकारणात यावेत. यामुळे पक्षात घराणेशाही सुरु होत नाही. पण पक्षाची सूत्रे एकाच घराण्याच्या हातात पिढ्यानं पिढ्या असेल तर ती घराणेशाही लोकशाहीसाठी धोकादायक आहे असं मोदी म्हणाले. नाव न घेता मोदींनी यातून काँग्रेसवर निशाणा साधला.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी सुद्धा इंफाळमध्ये झालेल्या कार्यक्रमात घराणेशाहीवरून टीका केली. ते म्हणाले की आम्ही एकमेव असा पक्षा आहे जो विचारधारेनुसार काम करत आहे. ज्यांचे सर्वाधिक कार्यकर्ते आहे. इतर सर्व राजकीय पक्ष हे कौटुंबिक पक्ष आहेत. सर्व घराणेशाहीपासून प्रेरीत झाले आहेत.

मोदी म्हणाले की, २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाची सुरुवात झाल्यानंतर आपण २६ नोव्हेंबर हा संविधान दिनाची परंपरा सुरु करायला हवी होती. आपल्याला संविधान काय देतं, कुठे नेतं याची दरवर्षी चर्चा झाली तर संविधान ज्याला जगात एक सामाजिक दस्ताऐवज मानला गेला. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला मोठी भेट दिली याची आपण दरवर्षी आठवण म्हणून हा दिन आता साजरा करतोय.



Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here