
अमल महाडिक उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले
5 तासांपूर्वी
कोल्हापूर – राज्यातील विधानपरिषेदच्या सहा जागांसाठी बिनविरोध निवडणूक व्हावी यासाठी दिल्लीत हालचाली झाल्या. मुंबई, धुळे-नंदुरबार या जागांच्या बदल्यात भाजपने कोल्हापूरची जागा सोडली असल्याची माहिती देण्यात आली आहे. दिल्लीवरून विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्याचे आदेश आल्यानंतर कोल्हापूरचे भाजप आघाडीचे उमेदवार माजी आमदार अमल महाडिक यांनी माघार आहे. त्यामुळे पालकमंत्री सतेज पाटील हे विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आले आहेत. अमल महाडिक उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आहेत.
हेही वाचा: राज्यातील सहाही विधानपरिषद निवडणुका बिनविरोध होणार?
अर्ज मागे घेतल्यानंतर बोलताना धनंजय महाडिक यांनी म्हटलं की पक्षाचा आदेश म्हणून आम्ही थांबण्याचा निर्णय़ घेतला. आता त्यावर चर्चा करण्याची आवश्यकता नाही. जिल्ह्यात महाडिक कुटुंबियांचं वर्चस्व आहे, होतं आणि भविष्यातही राहील. महाडिक गट म्हणून आम्ही निवडणुका लढवत होतो. आता आम्ही सगळे भारतीय जनता पक्षात सहयोगी आहोत. पक्षाचा आदेश मान्य करतो आणि जी काही वरिष्ठांमध्ये चर्चा झाली त्यानुसारच अर्ज मागे घेतला आहे. यापुढच्या निवडणुकासुद्धा भाजपच्या झेंड्याखालीच लढणवणार असल्याचंही धनंजय महाडिक म्हणाले.
अमल महाडिक यांनी म्हटलं की, मी भाजपचा सच्चा कार्यकर्ता आहे. ही निवड़णूक लढ्ण्याचा आणि अर्ज मागे घेण्याचा आदेश पक्षानेच दिला. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा आदेश दिला. त्यानुसारच मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं.
हेही वाचा: कोल्हापूर – सतेज पाटील बिनविरोध; महाडिकांची माघार
Esakal