समंथा रुथ प्रभू
sakal_logo

द्वारे

टीम ई सकाळ

दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू Samantha Ruth Prabhu ही काही महिन्यांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. घटस्फोटनंतर ती चारधाम यात्रेच्या प्रवासात व्यस्त होती. त्यानंतर तिने लगेचच कामाला सुरुवात केली आहे. तिचा तमिळ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘फॅमिली मॅन’ या वेब सीरिजमधील तिच्या अभिनयाला प्रेक्षक-समिक्षकांकडून दाद मिळाली. आता ती लवकरच एका आंतरराष्ट्रीय चित्रपटात दिसणार असून दिग्दर्शक फिलिप जॉन यांच्या ‘अ‍ॅरेंजमेंट ऑफ लव्ह’ यामध्ये ती काम करणार आहे. या चित्रपटामध्ये समंथा अत्यंत वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.

या चित्रपटाची निर्मिती सुनिता ताटी करणार आहेत. याआधी सुनीता यांनी समंथासोबत ‘ओह! बेबी’ नावाचा चित्रपट केला होता. आता आंतरराष्ट्रीय चित्रपटात समंथा बायसेक्शुअलची भूमिका साकारणार आहे. चित्रपटातील हे पात्र स्वतःची गुप्तहेर संस्था चालवते. याविषयी समंथाने सांगितलं, “मी फिलीप जॉनसोबत काम करण्यास खूप उत्सुक आहे, मी अनेक वर्षांपासून त्यांचे चित्रपट पाहत आले आहे आणि डाउनटन अॅबीची मी मोठी फॅन आहे. तसेच मी पुन्हा सुनीतासोबत काम करण्यास खूप उत्सुक आहे, मला आशा आहे की आमच्या ओह! बेबी चित्रपटाला जेवढं यश मिळालं त्यापेक्षा जास्त यश या चित्रपटाला मिळावं. माझी या चित्रपटातील भूमिका थोडी गुंतागुंतीची आहे आणि ते साकारणं माझ्यासाठी आव्हानात्मक आहे. पण सोबतच ही माझ्यासाठी एक चांगली संधी देखील आहे.” या चित्रपटाची शूटिंग ऑगस्ट २०२२ पासून सुरु होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: ‘ब्रेकअपनंतर मी असंख्य महिलांशी सेक्स केलं’; प्रसिद्ध अभिनेत्याचा खुलासा

समंथा अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या चित्रपटातील एका गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. या गाण्यासाठी तिने नुकताच होकार दिला. पहिल्यांदाच समंथा अशा पद्धतीने स्पेशल डान्स करताना दिसणार आहे. तिचा तमिळ कॉमेडी चित्रपटसुद्धा प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहे.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here