अरबाज मर्चंट
sakal_logo

द्वारे

स्वाती वेमुल

क्रुझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर आता दर शुक्रवारी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान Aryan Khan आणि त्याचा मित्र अरबाज मर्चंट Arbaaz Merchant यांना एनसीबी कार्यालयात हजेरी लावावी लागत आहे. जामीन देताना मुंबई उच्च न्यायालयाने ही अट घातली होती. त्यानुसार आज (शुक्रवार) आर्यन आणि अरबाजने अमली पदार्थविरोधी नियंत्रण विभागाच्या (एनसीबी) कार्यालयात हजेरी लावली. यावेळी अरबाज त्याचे वडील अस्लम मर्चंट यांच्यासोबत होता. कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर अस्लम हे पापाराझींसमोर पोझ देण्यासाठी उभे राहिले. इतकंच नव्हे तर त्यांनी अरबाजला त्यांच्यासोबत पोझ देण्यास सांगितलं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अस्लम मर्चंट हे पापाराझींसमोर पोझ देण्यासाठी उभे राहतात आणि अरबाजलाही पोझ देण्यास सांगतात. मात्र अरबाज अक्षरश: डोक्यावर हात मारतो आणि ‘स्टॉप इट’ असं त्याच्या वडिलांना म्हणतो. त्यानंतर तो तिथून पुढे निघून कारमध्ये बसते. या व्हिडीओवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. ‘पापा रॉक्स’ असं एकाने म्हटलंय, तर ‘अरबाजचे वडील कूल आहेत’, असं दुसऱ्याने लिहिलं आहे. ‘कूल डॅडीचा पुरस्कार यांनाच मिळाला पाहिजे’, असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय.

हेही वाचा: ‘आई कुठे काय करते’ मालिकेवर पुरस्कारांचा वर्षाव

३ ऑक्टोबर रोजी आर्यनसह अरबाजला एनसीबीने अटक केली होती. कॉर्डेलिया क्रुझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती. जवळपास तीन आठवडे आर्थर रोड जेलमध्ये राहिल्यानंतर त्यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला. जामीनासाठी असलेल्या १४ अटींपैकी एक अट म्हणजे यांना दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here