
ख्रिसमससाठी पुणे-करमळी विशेष रेल्वे
5 तासांपूर्वी
पुणे – ख्रिसमस तसेच नववर्षाच्या निमित्ताने मध्य रेल्वेतर्फे प्रवाशांसाठी पुणे स्थानकापासून गोव्यातील पणजीजवळील करमळी स्थानकापर्यंत विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. १७ डिसेंबर २०२१ पासून सुरू होणारी ही रेल्वे ९ जानेवारी २०२२ पर्यंत कार्यरत असेल.
या कालावधीत पुणे-करमळी गाडी क्रमांक ०१२९१ दर शुक्रवारी पुणे स्थानकातून सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी रवाना होईल, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता करमळी येथे पोहचेल. तर करमळी-पुणे गाडी क्रमांक ०१२९२ दर रविवारी करमळी स्थानकातून सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी रवाना होईल, आणि रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी पुणे येथे पोहचेल.
हेही वाचा: Pune : कौटुंबिक वादातून आत्महत्या करणाऱ्याचे पोलिसांनी वाचवले प्राण
यादरम्यान ही गाडी लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी आणि थिविम या स्थानकांवर थांबेल. या रेल्वेत एक एसी टू टीयर, चार एसी थ्री टीयर, ११ स्लीपर आणि ४ सेकंड सीटिंग कोच असतील. या रेल्वेचे आरक्षण २८ नोव्हेंबरपासून उपलब्ध असेल.
Esakal