
5 तासांपूर्वी
सातारा ः येथील एलआयसी ऑफ इंडियाच्या सातारा विभागीय कार्यालयाच्या खेळाडू वैशाली विनायक आगाशे यांची ५० वर्षांवरील वयोगटात महिला एकेरी व महिला दुहेरी विभागात वेल्वा, स्पेन येथे होणाऱ्या वर्ल्ड (सिनिअर्स) मास्टर बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे.
आगाशे सातारा जिल्ह्यातून या स्पर्धेसाठी निवड झालेल्या एकमेव खेळाडू असून, त्याबद्दल त्यांचा सातारा बॅडमिंटन जिल्हा संघटनेतर्फे महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे उपाध्यक्ष व सातारा जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजीराजे भोसले व महाराष्ट्राचे खेलो इंडियाचे मार्गदर्शक मनोज कान्हेरे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
हेही वाचा:
परमबीर सिंह यांच्यावरील कारवाईबाबत गृहमंत्री म्हणाले की…
नुकत्याच मडगाव गोवा येथे झालेल्या निवड चाचणीतून त्यांची ही निवड करण्यात आली आहे. या जागतिक स्पर्धेसाठी पात्र होण्याची त्यांची ही तिसरी वेळ आहे. २०१३ रोजी टर्की व २०१९ रोजी पोलंड येथे झालेल्या स्पर्धेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. या जागतिक स्तरावरील स्पर्धा २८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत वेल्वा, स्पेन येथे होणार आहेत. वैशाली आगाशे गेली ३१ वर्षे भारतीय आयुर्विमा महामंडळात खेळाडू म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावर स्पर्धेत भाग घेऊन यश संपादन केले आहे.
Esakal