neelam-gorhe
sakal_logo

द्वारे

ओमकार वाबळे

राज्याचा मूड काय आहे या अहवालातून अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. त्यातून मिळालेल्या आकडेवारीतून वेगवेगळ्या गोष्टी पुढे आल्या आहेत. यावर शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी मत व्यक्त केलं. 2013 पासून अनेक सर्वेक्षणं झाली. 2014 जेव्हा स्थलांतराचा सकाळचा कौल झाला तेव्हा त्यातून अनेक गोष्टी घडल्या. तर आनंदी आनंद जरुर आहे. दोन वर्षे पूर्ण होताना ठाकरे सरकारला आणखी मोठी झेप घेण्याची गरज वाटते, असं शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे म्हणाल्या.

राज्यात महाविकास आघाडीला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. दोन वर्षात महाविकास आघाडीला कोणकोणत्या बाबतीत यश आलं, राज्य सरकारच्या कोणत्या निर्णयांचं नागरिकांनी स्वागत केलं, कोणते निर्णय सरकारची प्रतिमा डागाळत आहेत, याचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये शिवसेना आणि ठाकरे सरकारबद्दल महत्वाची निरीक्षणं नोंदवण्यात आली.

भाजपची सत्ता आहे. त्यांनी सत्तेचा गैरवापर कसा करायचा हे दाखवून दिलं आहे. त्यांनी अनेकांना वेसण घालण्याचा प्रयत्न केला. जिल्हा परिषद, महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपचे काय झाले हे दिसून आले आहे. त्यांनी साम दाम दंड भेद करुन त्यांनी सत्तेसाठी प्रयत्न केले. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. आमचे काम मजबूत आहे, असं त्या म्हणाल्या. मात्र,विरोधकांना कमी लेखून चालणार नाही, हे त्यांनी अधोरेखित केलं.



Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here