परकीय चलन

डीआरआय अधिकाऱ्यांनी भारताबाहेर परदेशी चलनाची तस्करी करणाऱ्या दोन प्रवाशांना अटक केलीय.

sakal_logo

द्वारे

टीम ई-सकाळ

मुंबई : ऑपरेशन चेक शर्ट्स अंतर्गत डेटा विश्लेषणाचा वापर करून, महसूल गुप्तचर संचालनालयानं (Directorate of Revenue Intelligence) भारताबाहेर परदेशी चलनाची तस्करी करणाऱ्या दोन प्रवाशांना अटक केलीय. आज (26 नोव्हेंबर) सकाळी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर शारजाला जाणाऱ्या दोन प्रवाशांना डीआरआय अधिकाऱ्यांनी अडवलं आणि त्यांच्याकडे चौकशी सुरु केली.

DRI नं त्यांच्या सामानाची तपासणी केली असता, त्यांच्याकडे अमेरिकन डॉलर आणि सौदी दिरहमच्या रूपात विदेशी चलन सापडले. जप्त केलेल्या विदेशी चलनाची किंमत 3.7 कोटी रुपये आहे. हे स्कॅन करता येऊ नये, म्हणून परकीय चलन सामानात लपवून ठेवले होतं. या प्रवाशांकडून जप्त करण्यात आलेले विदेशी चलन, सीमा शुल्क कायदा 1962 च्या कलम 110 अन्वये गुन्हा नोंदवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आलीय.

हेही वाचा: #कलमहाराष्ट्राचा : राज्यात ‘मनसे’सह ‘वंचित’चा देखील टक्का वाढला

याआधी शुक्रवारी डीआरआयनं तैवान आणि दक्षिण कोरियामार्गे हाँगकाँगला जाणाऱ्या 42 कोटी रुपयांच्या सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश केला होता. हे सोनं मशिनरी पार्ट्सच्या स्वरूपात आणलं जात असल्याची गुप्त माहिती डीआरआयला मिळाली होती. या माहितीच्या आधारे दिल्ली विमानतळाच्या (Delhi Airport) एअर कार्गो कॉम्प्लेक्समध्ये (Air Cargo Complex) तपासणी सुरू केली असता, ट्रान्सफॉर्मरला बसवलेलं इलेक्ट्रो प्लेटिंग मशिन ई शेपमध्ये लपवून ठेवल्याचं आढळून आलं. डीआरआयच्या म्हणण्यानुसार, 1 किलो सोनं एका मशीनमध्ये ठेवण्यात आलं होतं. अशा प्रकारे एकूण 80 मशिनमधून हे सोनं जप्त करण्यात आलं. सुमारे 42 कोटी रुपयांचं 85 किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here