
आसाम आणि मिझोराम सरकारनं त्यांच्या आंतरराज्य सीमेवर कुंपण वाढवण्याचा निर्णय घेतलाय.
६ तासांपूर्वी
आसामचे (Assam) मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) आणि मिझोरामचे मुख्यमंत्री जोरामथांगा (CM Zoramthanga) यांनी सीमावाद सोडवण्यासाठी आज शुक्रवारी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. गृहमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत दोन्ही राज्यांच्या सरकारांनी सीमेवर शांतता राखण्याचा निर्णय घेतलाय.
या बैठकीची माहिती देताना हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, राज्य सरकार राजकीय पातळीवर दोन टीम तयार करतील आणि कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी लवकरच चर्चा केली जाईल. वृत्तसंस्था एएनआयनं आसाम मुख्यमंत्र्यांच्या अहवाल्यानं म्हटलंय, की केंद्रीय गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री स्तरावरही वेळोवेळी चर्चा केली जाईल, असं ठरलंय. या बैठकीत प्रत्येक मुद्यावर चर्चा झालीय. आसाम-मिझोराम सीमेवर आम्ही शांतता राखू, असा निर्णय दोन्ही राज्य सरकारांनी घेतला असून आम्ही याला अत्यंत संवेदनशीलतेनं सामोरे जाऊ, असंही ते म्हणाले.
हेही वाचा: RJD अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची प्रकृती खालावली
आसाम-मिझोरमच्या मुख्यमंत्र्यांमध्ये सीमाप्रश्नावर चर्चा
आसाम आणि मिझोराम सरकारनं गुरुवारी त्यांच्या आंतरराज्य सीमेवर कुंपण वाढवण्याचा निर्णय घेतलाय. जुलैमध्ये दोन्ही राज्यांमधील सीमेवर झालेल्या हिंसाचारात आसामचे पाच पोलिस कर्मचारी आणि एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. मिझोरमचे मुख्यमंत्री जोरामथांगा यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्याशी दोन तास चाललेली बैठक सौहार्दपूर्ण असल्याचं म्हटलंय. अधिकाऱ्यांनी सांगितलं, की केंद्रीय गृह मंत्रालयाच्या हस्तक्षेपानंतर दोन्ही मुख्यमंत्र्यांनी सीमा विवाद सोडवण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीनंतर जोरामथांगा यांनी पत्रकारांना सांगितलं, की आमची भेट चांगली झाली. आम्ही भावांसारखे आहोत. उद्या आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची एकत्र भेट घेणार आहोत. आम्ही सीमेवरील कुंपण वाढवण्याचा प्रयत्न करू, असंही त्यांनी सांगितलं.
हेही वाचा: मुंबई विमानतळावर 3.7 कोटींचं विदेशी चलन जप्त; ‘DRI’कडून दोघांना अटक
Esakal