
२६ नोव्हेंबर २०२१
राज्याचा मूड काय आहे या अहवालातून समोर आला आहे. सकाळ, सामचा महासर्व्हे घेण्यात आला. त्यातून मिळालेल्या आकडेवारीतून वेगवेगळ्या गोष्टी पुढे आल्या आहेत.
राज्यात महाविकास आघाडीला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. दोन वर्षात महाविकास आघाडीला कोणकोणत्या बाबतीत यश आलं, राज्य सरकारच्या कोणत्या निर्णयांचं नागरिकांनी स्वागत केलं, कोणते निर्णय सरकारची प्रतिमा डागाळत आहेत, याचा अभ्यास करण्यात आला.
राज्यातील जनतेच्या मनात नक्की काय चाललंय, लोकांचं मत काय आहे, याचा कानोसा घेण्याचा प्रयत्न सकाळ समुहाने केला आहे. यातून राज्य सरकारची कामगिरी कशी आहे, याची माहिती घेण्यात आली. यामध्ये महिला मुख्यमंत्रीपदासाठी पंकजा मुंडे यांचं नाव मागे पडलंय.
जनतेच्या मनातील मुख्यमंत्री कोण याचाही मागोवा घेण्यात आला. यामध्ये अद्याप उद्धव ठाकरे अव्वल आहेत. त्यांना 29.7 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. दुसऱ्या क्रमांकावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असून त्यांना 22.4 टक्के नागरिकांनी पसंती दर्शवली. तर तिसऱ्या क्रमांकाव अजित पवार आहेत. उपमुख्यमंत्र्यांना 16.4 टक्के मतदारांनी पसंती दिली आहे.

मीच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री!
जनतेच्या मनातील मुख्यमंत्री जाणून घेताना आणखी एक खुलासा झाला आहे. पंकजा मुंडे कायम त्या जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचा दावा करतात. मात्र, महिला मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत त्यांना 4.2 टक्के मतदारांनी पसंती दिली आहे. त्यापेक्षा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना जास्त मतदारांनी पसंती दर्शवली आहे. सुप्रिया सुळे यांना 5.9 टक्के नागरिकांनी मुख्यमंत्री पदासाठी योग्य समजलं आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या पेक्षा सुप्रिया सुळेंची लोकप्रियता अधिक असल्याचं सर्व्हेक्षणात समोर आलंय.
Esakal