हसन मुश्रीफ

कागल मध्ये झालेल्या मेळाव्यात तसेच गोकुळच्या सभेतच सतेज पाटील यांनी विधान परिषदेचा विजय घोषित केला होता.

sakal_logo

द्वारे

सुनील पाटील : सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : विकासाचे राजकारण करत असताना राजकारणात व्यक्तिगत मतभेद असणे गरजेचे नाही. निवडणूकीच्यावेळी निवडणूक केल्याच पाहिजे. मात्र, इतर वेळेला हातात-हात घालून कोल्हापूर जिल्ह्याचा विकास कसा करता येईल, याचा विचार केला पाहिजे. विधानपरिषद निवडणूकीनिमित्त भाजपचे माजी आमदार अमल महाडिक आणि शौमिका महाडिक (Amal Mahadik, Shaumika Mahadik)यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे, महाविकास आघाडीचे उमेदवार व कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil)यांची बिनविरोध निवड झाली. यामुळे, या दोन्ही कुटूंबातील मतभेद कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif)यांनी व्यक्त केली.

विधानपरिषदेच्या कोल्हापूर मतदार संघात बिनविरोध निवड झाल्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्हाधिकारी तथा विधानपरिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी राहुल रेखावार यांच्याकडून प्रमाणपत्र स्विकारले. त्यानंतर मुश्रीफ यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मुश्रीफ म्हणाले, विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली आहे. माजी आमदार अमल महाडिक व शौमिका महाडिक यांनी आपले अर्ज मागे घेतल्यामुळे त्यांचे अभिनंदन करायला हवे. यानिमित्त पाटील आणि महाडिक या कुटूंबातील वाद कमी व्हावेत, अशी अपेक्षा आहे. दरम्यान, कागल मध्ये झालेल्या मेळाव्यात तसेच गोकुळच्या सभेतच सतेज पाटील यांनी विधान परिषदेचा विजय घोषित केला होता. केवळ फॉर्म भरण्याची औपचारिकत राहिलेली होती. गेल्या सहा वर्षात सतेज पाटील यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायतींसोबत चांगला संबंध ठेवला आहे. सर्व नगरसेवकांसह सदस्यांसोबत चांगले संबंध प्रस्तापित केले आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर ते पालकमंत्री झाले. त्यामुळे ग्रामविकासमंत्री म्हणून आपला व पालकमंत्री म्हणून त्यांचा प्रचंड निधी जिल्ह्यात आणता आला. दोन वर्षात चांगला निधी दिला. हे सर्वच जाणून होते, पण भाजप ला ते लक्षात आले नाही. आमचा विजय हा त्यांना दिलेल्या निधीवर आणि विकास कामाच्या जोरावर विजयी झाले आहेत. .

कोल्हापूर जिल्ह्यातील विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी कोणते सुत्र ठरले आहे. याची माहिती आपल्याला नाही, तर ती माहिती सतेज पाटील यांना आहे. याशिवाय, स्थानिक राजकारणाचे काय ठरले आहे. हे सतेज पाटील यांनाच माहिती असले अशी माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली.

बिनविरोधच्या प्रक्रियेत आम्ही नाही

विधानपरिषद निवडणूकीच्या पडद्यामागील आणि पडद्या पुढच्या घडामोडी काय झाल्या या आम्हाला माहिती नाहीत. त्या आता होतीलच आम्हीही याच जिल्ह्यातील आहे. आम्हाला फक्त मुंबई, धुळे आणि कोल्हापूर या निवडणूका बिनविरोध झाल्या आहेत, हे कळले होते. यापुर्वी भाजपने कॉंग्रेसच्या राज्यसभेची आणि विधानसभेची निवडणूक बिनविरोध केली होती. त्याचीच ही परतफेड असेल असेही मुश्रीफ यांनी सांगितले.

हेही वाचा: शहांनी महाडीकांना दिला ‘शब्द’ ; विनय कोरे चर्चेच्या केंद्रस्थानी

जिल्हा बॅंक बिनविरोधचा दावा करणार नाही

कोल्हापूर जिल्हा मध्यतर्वी सहकारी बॅंक बिनविरोधसाठी प्रयत्न सुरु आहेत. आज बैठक घेवून चर्चा करणार आहे. ज्या नऊ जागा आहेत. त्या बिनविरोध होईल. पण, तालुका पातळीवर असणारा संघर्ष कमी होत नाही. त्यामुळे जिल्हा बॅंक बिनविरोध होईल, असा काहीही दावा करणार नसल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here