
राज्यपाल कोश्यारी सोमवारी आळंदीत
5 तासांपूर्वी
आळंदी: संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या सप्त शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त कार्तिकी वारीसाठी आणि समाधी दर्शनासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सोमवारी (ता. २९) आळंदीत उपस्थित राहणार आहेत.
याबाबतचे पत्र राज्यपालांचे प्रधान सचिव संतोषकुमार यांनी आळंदी देवस्थानला दिले आहे. राज्यपालांनी कार्तिकी वारीसाठी उपस्थित राहण्याची विनंती आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी केली होती. त्यानुसार कोश्यारी हे समाधी दर्शन आणि वीणा मंडपातील कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
Esakal