रत्नागिरी - नागपूर महामार्गासाठी जिल्ह्यातील मोजणी अखेर पूर्ण

रत्नागिरी – नागपूर महामार्गासाठी जिल्ह्यातील मोजणी अखेर पूर्ण

sakal_logo

द्वारे

सकाळ वृत्तसेवा

शि: रत्नागिरी- नागपूर महामार्गासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील मोजणी अखेर आज पूर्ण झाली. मोजणीचे काम झाल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आता मूल्यांकनाचा विषय चर्चेत घेतला आहे. मूल्यांकनाचा मुद्दाही वादाचा ठरू शकतो. कारण शासनाने रेडीरेकनरच्या चार ते पाच पट दर निश्चित करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांनी सर्वाधिक रेडीनेकरच्या सात पट दराची मागणी केली आहे. भुये, भुयेवाडी (ता. करवीर) येथील अपवादात्मक नऊ गट नंबरमधील मोजणीस विरोध झाला.

त्यामुळे भूमिअभिलेख विभागाने संबंधित क्षेत्राची मोजणी सोडून दिली. जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील आंबा येथून हातकणंगले तालुक्यातील चोकाक या दरम्यानच्या सर्व गावातील मोजणी पूर्ण झाली. भुये, भुयेवाडी येथील बाधित शेतकऱ्यांनी माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली कडवा विरोध केला होता. माजी आमदारांच्या भूमिकेमुळे मोजणी अधिकारीही मोजणी न करता दोन वेळा परत गेले. त्यामुळे प्रशासनाने विधान परिषदेचा बंदी आदेश सुमारे ऐंशी टक्के शेतकऱ्यांची लेखी ना हरकत, कडेकोट बंदोबस्त अशी जय्यत तयारी करून काल सकाळी अकरा वाजता मोजणी सुरू केली.

भुयेवाडी येथील तीन गट क्रमांकात व भुये येथील सहा गट क्रमांकात शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला. विरोध असणाऱ्या ठिकाणी मोजणी न करण्याची भूमिका माजी आमदार नरके यांनी मांडल्याने तेथील मोजणी प्रलंबित ठेवली. उर्वरित मोजणी पूर्ण झाल्याने रत्नागिरी – नागपूर महामार्गासाठी भूसंपादनाचा पहिला टप्पा पूर्ण झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व गावातील मोजणी पूर्ण झाली आहे. शेतकऱ्यांच्या विरोधामुळे भुये-भुयेवाडी येथील काही गट क्रमांक प्रलंबित ठेवले आहेत. याबाबत प्रशासकीय स्तरावर पुढील निर्णय घेण्यात येईल.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here