अजित पवार |

पुण्यातील गायन आणि इतर कार्यक्रमांना 100 टक्के मुभा; डिसेंबरमध्ये भीमथडी जत्रेला परवानगी
#Ajeetpawar #jumbocovidcenterpune #coronavirus

sakal_logo

द्वारे

टीम इस्का टीम

पुणे : गेल्या काही दिवसांपासून शहरातील कोरोना रूग्णांची संख्या कमी होत आहे ही अतिशय दिलासादायक बाब आहे. मात्र, पुणे शहर आणि पिंपरी-चिंडवडमधील जंम्बो कोविड रूग्णालय आहे त्याच परिस्थीतीत सुरू ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते.

दरम्यान, रूग्णसंख्या कमी होत असल्याने शहराती गायन आणि इतर कार्यक्रमांना देण्यात आलेली 50 टक्के उपस्थीतीची मर्यादा शिथिल करण्यात आली आहे. तसेच डिसेंबर महिन्यात आयोजित करण्यात येणाऱ्या भीमथडी जत्रेलादेखील परवानगी देण्याचा निर्णय एकमताने आजच्या बैठकीत घेण्यात आल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, या कार्यक्रमाला परवानगी देण्यात आली असली तरी, या ठिकाणी कोरोना नियमांचे तंतोतंत पालन कारावे, लागणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.



Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here