तारा सुतारिया, अहान शेट्टी
sakal_logo

द्वारे

प्रणाली अधिक

अॅक्शन हिरो म्हणून अनेक वर्ष बॉलीवूडवर राज्य करणारा अभिनेता सुनिल शेट्टी सध्या हवा तसा सिनेइंडस्ट्रीत अॅक्टीव्ह नाही. पण असं असलं तरी त्याच्या दोन्ही मुलांनी मात्र बॉलीवूडमध्ये ऑलरेडी एन्ट्री केलेली आहे. त्याची मुलगी अथिया शेट्टीने एक दोन सिनेमे वगळता फार चमक दाखवलेली नसली तरी क्रिकेटर के.एल.राहूलसोबतच्या तिच्या अफेअरच्या चर्चांनी मात्र तिला फेम नक्कीच मिळवून दिलंय. आता सुनिल शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी बॉलीवूडमध्ये आपल्या अॅक्टिंगची कमाल दाखवण्यासाठी तयार झाला आहे. साजिद नाडियादवाला निर्मित आणि मिलन लुथरिया दिग्दर्शित तडप या सिनेमातनं तो पदार्पण करतोय. येत्या 3 डिसेंबरला तो सिनेमा प्रदर्शित होतोय.

तारा सुतारिया, अहान शेट्टी

तारा सुतारिया, अहान शेट्टी

नुकतंच अहान शेट्टीने एका मुलाखती दरम्यान सांगितलं होतं की,”मी अगदी सर्वसामान्यांप्रमाणे फिल्मइंडस्ट्रीत एंट्री करण्यासाठी स्ट्रगल केलंय. माझे वडील बॉलीवूड स्टार असतानाही मी निर्मात्या-दिग्दर्शकांच्या ऑफिसच्या पाय-या झिजवल्या आहेत. माझे रेकॉर्ड केलेले अॅक्टिंग आणि डान्सचे व्हिडिओ मी त्यांना पाठवत होतो. ऑडिशन्सही देत होतो. साजिद नाडीयादवाला यांनी माझे व्हिडिओ पाहूनच मला ऑडिशन्ससाठी बोलावलं होतं. त्यामुळे मी मिळवलेला माझा पहिला सिनेमा हा मी माझ्या मेहनतीवर मिळवलेला आहे”.

हेही वाचा: बदललेल्या ‘ट्रॅक’वरही ‘ट्रेंड’ होत राहिलो

तो पुढे म्हणाला,”जेव्हा मी स्क्रीप्ट वाचली तेव्हा त्यामध्ये इंटिमेट सीन आहेत हे मला कळलं होतं. पण तोपर्यंत सिनेमाची अभिनेत्री कोण आहे हे माहित नव्हतं,त्यामुळे आणखी दडपण आलं होतं. मी स्वतःशीच म्हणालो की,बापरे मला कोणाला कीस करावं लागणार आहे? अखेर जेव्हा सिनेमाचं चित्रिकरण सुरू झालं,तारा या सिनेमाची हिरॉईन आहे हे कळलं आणि अखेर किसिंग सून शूट करायची वेळ आली तेव्हा मी खूपच घाबरलो होतो. पण मग मी स्वतःलाच एक गोष्ट समजावली की हा सीन मी अहान म्हणून नाही तर माझ्या भूमिकेची गरज म्हणून करतोय. त्यामुळे मला दडपण घ्यायची,घाबरायची काहीच गरज नाही. मी त्या किसिंग सीननाही सिनेमातल्या इतर कॉमेडी,अॅक्शन सीनप्रमाणेच केला. आणि शेवटी हा सिनेमा आहे,काल्पनिक चित्र असलेला,खरं काही नाही. मग सगळं सोपं होत गेलं”.Esakal

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here