
5 तासांपूर्वी
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने चार दिवसाच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा एकदा 29 व 30 नोव्हेंबरला कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, ठाणे,अहमदनगर (Raigad,Ratnagiri,Sindhudurg,Pune,Satara,Sangli, Kolhapur) या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. याबरोबरच कोकणात ढगाळ हवामान, पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह गडगडाटी वादळाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
हेही वाचा: KDDC Bank Election : जिल्हा बँकेसाठी ५ जानेवारीला मतदान
मागील पंधरवड्यात मुसळधार पाऊस पडल्याने आंबा हंगामावर परीणाम झाला आहे. १५ ते २० दिवस आंबा उशीराने मार्केटमध्ये दाखल होईल अशी परीस्थिती आहे. सध्या आलेला मोहोर ५ टक्के गळून गेला असून, उरलेला मोहोर वाचवण्यासाठी बागायतदारांची कसरत सुरु आहे. फवारणीचा खर्च वाढतोयं अशी सध्या कोकणातील परीस्थिती आहे. आता परत पाऊस झाला तर बागायतदारांना फवारणीचा खर्च वाढवायला लागेल.
ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून उसाची तोड सुरू झाली आहे. नोव्हेंबरपासून या तोडीमध्ये गती आली आहे. पहिल्या टप्प्यात पक्क्या रस्त्याशेजारी असलेल्या शेतातील उसाची उचल झाली. आता आतील बाजूच्या उसाची तोड सुरू झाली आहे. सध्या ऊस तोड हंगाम जोरात सुरु आहे. पावसाच्या भितीने उसाची तोड लगबगीने करण्याची शिवारात धांदल उडाली आहे. रब्बी ज्वारीसाठी पावसाची आवश्यकता असली तरी त्याची हुलकावणी मिळत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. नव्या उसाची लागणही सुरु झाली आहे.
Esakal