जगातील सर्वात उंच जलतरण तलाव: जगात इंजिनियरिंगची एकापेक्षा एक अचंबित करणारी उदाहरणे आहेत. उत्कृष्ट इंजिनियरिंगचे असेच एक उदाहरण म्हणजे ‘ऑरा स्कायपूल’ (Aura Skypool Infinity Pool). दुबईतील(dubai) या स्कायपूलचे वैशिष्ट्य म्हणजे जमिनीपासून तो तब्बल २०० मीटर उंचीवर आहे. येथून आजूबाजूच्या दृश्यांचा ३६० अंशात (360 Degree Views) अनुभव घेता येतो. हा पूल अरेबियन गल्फ होरायझनवर(Arabian Gulf Horizon) बांधला गेला आहे आणि इतक्या उंचीवरचा हा पहिला स्विमिंग पूल (Swimming Pool) आहे. सनबेड आणि बेडस्पोक वेलकम पॅक प्रत्येक तिकिटासह उपलब्ध आहे. त्याद्वारे पूलच्या लाउंजमध्ये प्रवेश देखील मिळतो. पाम टॉवरच्या (Palm Tower) ५० व्या मजल्यावर हा स्विमिंग पूल तयार करण्यात आला आहे. (World’s highest swimming infinity pool Aura pool Dubai)






Esakal