नक्षल
sakal_logo

द्वारे

सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : भामरागड तालुक्यातील कोटी पोलीस मदत केंद्राअंतर्गत येत असलेल्या मरकनार ते मुरूमभुशीकडे जाणाऱ्या रस्त्याचे विकासकाम सुरू असताना नक्षलवाद्यांनी दोन ट्रॅक्टरची जाळपोळ केल्याची माहिती प्राथमिक सुत्रांकडून मिळाली आहे.

१३ नोव्हेंबर रोजी ग्यारापत्ती, मर्दिनटोला जंगल परिसरात झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत सेंट्रल कमिटी सदस्य मिलिंद तेलतुंबडेसह २७ नक्षल्यांचा पोलिसांनी खात्मा केला होता. त्याच पार्श्वभूमीवर तीन दिवसाआधी पत्रके टाकून २७ नोव्हेंबर रोजी बंदचे आवाहन नक्षलवाद्यांनी केले होते. पोलिस मदत केंद्र कोटीअंतर्गत मरकनार ते मुरूमभुशी रस्त्याचे विकासकाम कंत्राटदार अखिलेश मिश्रा यांच्यामार्फत काम सुरू आहे.

हेही वाचा: Big Breaking : संपूर्ण लसीकरण झालेल्यांनाच प्रवासाची मुभा; राज्य सरकारचा मोठा निर्णय

येथे नक्षल्यांनी दमदाटी करीत दोन ट्रॅक्टरला आग लावून जाळपोळ केली आहे. या घटनेमुळे नक्षलग्रस्त भागात असलेल्या नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून कोटी पोलिसांना माहिती प्राप्त होताच आज (ता. २७) सकाळी घटनेस्थळी पोलिस रवाना झाले असून अधिक तपास करीत असल्याची प्राथमिक माहिती सूत्राकडून प्राप्त झाली आहे.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here