
संयुक्त किसान मोर्चाकडून संसदेवर काढण्यात येणारा ट्रॅक्टर मार्च स्थगित
5 तासांपूर्वी
नवी दिल्ली : संसदेवर २९ नोव्हेंबर रोजी काढण्यात येणारा ट्रॅक्टर मार्च संयुक्त किसान मोर्चाकडून तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. शेतकरी नेते दर्शन पाल सिंग यांनी शनिवारी ही माहिती दिली. सिंघू बॉर्डवर शेतकऱ्यांची बैठक पार पडल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
ट्रॅक्टर मार्च स्थगित करण्यात आल्यानंतर भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी अमृतसर येथे माध्यमांशी बोलताना सांगितलं की, आम्ही मांडलेल्या मागण्यांवर विचार करण्यासाठी आम्ही सरकारला ४ डिसेंबरपर्यंतचा वेळ दिला आहे. यानंतर समिती ४ डिसेंबर रोजी पुढील निर्णय घेईल.
Esakal