
5 तासांपूर्वी
बेळगाव : बेळगावमधील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार करण्यात आली असून तिसरे रेल्वे फाटक परिसरातील रस्ताच्या दुरुस्तीची मागणी करण्यात आली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून तिसरे रेल्वे फाटक परिसरातील रस्त्याची स्थिती दयनीय झाली आहे, गेल्या पावसाळ्या पासून या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत तसेच अवकाळी पावसामुळे खड्डे आणखी मोठे होऊन एक प्रकारे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे नागरिक या रस्त्यावरून येजा करताना जीव मुठीत धरून प्रवास करीत आहेत
रेल्वे उड्डाण पुलाचे काम देखील संथगतीने सुरु असल्याने दोन बाजूची वाहतूक एक बाजूला वळविण्यात आली आहे. त्यामुळे सातत्याने वाहतुक कोंडी होत आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत, यामध्ये उसाची वाहतूक वाढली असून काही दिवसांपूर्वी भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली या रस्त्यावर पडलेल्या खड्डयांमुळे पलटली व वाहन मालकांला भुर्दर्ड बसला आहे या रस्त्यावर हॉटेल्स, इस्पितळ, वाहन शोरूम्स तसेच उद्यमबाग आद्योगिक वसाहत देखील वसली आहे म्हणून हा रस्ता बेळगावकरांसाठी महत्वाचा असून या रस्त्यावर कामगार वर्गाचा जास्त वावर असतो .
हेही वाचा: ‘राष्ट्रवादीचा पोपटराव दिवसभर बोलत असतो’
दुरुस्ती साठी स्थानिक नागरिकांनी वारंवार महापालिकेच्या निदर्शनास आणून देखील आजवर दुरुस्ती केलेली नाही याची दखल घेऊन तातडीने काम हाती घेण्याची सूचना करावी असे पत्र युवा समितीतर्फे पंतप्रधान कार्यालयाला पाठविण्यात आले आहे.
या रस्त्याची दुरावस्था होऊन देखील दुरुस्ती केली जात नसल्याने एखाद्याचा जीव गेल्यावरच महानगर पालिका प्रशासन जागे होणार आहे का अशा संतप्त प्रतिक्रिया शहरवासीयांमधुन व्यक्त होत आहे.
Esakal