
5 तासांपूर्वी
नेर्ले: शासकीय रेल्वे मध्ये ज्युनिअर इंजनिअर म्हणून नोकरी लावतो असे आमिष दाखवून कराड तालुक्यातील तिघांसह व पुण्यातील एका महिलेने तब्बल ११ लाख रुपयांचा गंडा घातला असल्याची घटना घडली आहे.वाळवा तालुक्यातील तांबवे येथील पवन मोरे असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे.याबाबत पवन मोरे (वय २७) याने गंडा घालणाऱ्या सचिन संदिपान पवार, माधुरी संदिपान पवार, महेश संदिपान पवार (सर्व राहणार तासवडे- बेलवडे ता. कराड) व संजीवनी निलेश पाटणे (रा. पुणे, आपटे वस्ती पुनावळे)यांचे विरोधात कासेगाव पोलिसांत फसवणूकीची तक्रार केली आहे.या चौघांवर कासेगाव पोलिसात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.यातील तिघांना एकूण सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
कासेगाव पोलीस यांच्याकडून मिळालेली माहिती अशी, वाळवा तालुक्यातील तांबवे येथे दंड भागात राहणारा पवन सुर्यकांत मोरे याचे मेकॅनिकल मधून इंजनिअरिंग चे शिक्षण पूर्ण झाले आहे.तो सद्या एक खासगी कंपनीत नोकरीस आहे.गंडा घालणारी माधुरी पवार,सचिन पवार, महेश पवार,व संजीवनी पाटणे यांनी पवन कडून शासकीय रेल्वेमध्ये नोकरी लावतो म्हणून कोरोनाच्या काळात ५ नोव्हेंबर २०१९ पासून ते ४ मार्च २०२१ पर्यंत वेळोवेळी तब्बल ११ लाख रुपये घेऊन फसवणूक केली.नोकरीचे अमिष दाखवून आपणाला गंडा घातला असल्याचे पवन याच्या लक्षात आले.
हेही वाचा: ‘जर ते मला अटक करायला आले..’; दुसऱ्या FIR वर कंगनाची प्रतिक्रिया
त्याने माधुरी पवार व इतर तिघांकडे वारंवार पैसे मागणी केली.परंतु वारंवार सांगून देखील माधुरी पवार सचिन पवार महेश पवार व संजीवनी पाटणे यांनी पैसे दिले नाहीत. याबाबत पवन मोरे यांनी कासेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. चौघांवर कासेगाव पोलिसांत फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक अविनाश मते यांचे मार्गदर्शनाखाली हवलदार आनंदा जाधव तपास करीत आहेत.यातील तिघा आरोपींना एकूण ७ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.सरकारी वकिल संतोष कुमार जाधव यांनी युक्तिवाद केला.
हेही वाचा: भाजपामध्ये ‘या’ आयारामाना ‘अच्छे दिन’, सहज मिळाली आमदारकी-खासदारकी
नोकरीच्या आमिषाने गंडा घालण्यात सराईत असलेली मुख्य आरोपी माधुरी पवार हिच्यासह चौघांनी पश्चिम महाराष्ट्रात अनेकांना नोकरीच्या आमिषाने कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला असल्याचे समजते.माधुरी पवार व संजीवनी पाटणे यांच्यावर कोल्हापूर जिल्ह्यातील नेसरी,सातारा जिल्ह्यातील तळबीड,पुणे येथील निगडी येथील पोलिसात गुन्हे दाखल आहेत.
चारही आरोपीवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून आरोपींची कसून चौकशी सुरू आहे.त्याच्यातून अधिक माहिती स्पष्ट होईल.वरील आरोपींनी नोकरीच्या आमिषाने जर कोणाकडून पैसे उकळले असतील तर फसवणूक झालेल्या लोकांनी कासेगाव पोलिसात तक्रार करावी.
Esakal