गाड्या
sakal_logo

द्वारे

प्रशांत कांबळे

मुंबई : नव्याने नोंदणी होणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहन विक्री करताना (New vehicle selling) वितरक ग्राहकांकडून (consumer) हँडलिंग चार्जेस (handling charges) अतिरिक्त रक्कम (extra money) वसूल करतात. यामुळे ग्राहकांची फसवणूक (fraud) होते. नवीन ग्राहकांकडून कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क वसूल करण्यात येऊ नयेत, असे आदेश देण्यात आले आहे. परिवहन विभागाने आता राज्यभरातील आरटीओ अधिकाऱ्यांना (RTO Authorities) वितरकांची काटेकोर तपासणीचे आदेश दिले आहे.

हेही वाचा: नागरिकांना दोन डोस अनिवार्य; कोरोना नियम मोडणाऱ्यांवर होणार कारवाई

वितरकांनी वाहनांकरीता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येऊ नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. वाहन नोंदणीसाठी वितरकांनी प्रादेशिक, उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात जमा केलेल्या कागदपत्रांची काटेकोर तपासणी करून वितरकाने ग्राहकांकडून शासनाने निश्चित केलेल्या नोंदणी शुल्क व कर या व्यतिरिक्त कोणतेही अतिरिक्त शुल्क स्वीकारण्यात न आल्याची खातरजमा करूनच वाहनाचा नोंदणी क्रमांक जारी करावा, नव्याने नोंदणी होणाऱ्या वाहनांचे निश्चित केलेले शुल्क आकारूनच त्याची वाहन ४.० या संगणक प्रणालीवर नोंद घ्यावी, वाहन नोंदणीसाठीचे नोंदणी शुल्क व कर याबाबतची माहिती प्रत्येक वितरकाने शो रुममधील दर्शनी भागामध्ये प्रदर्शित करावी, अशा सूचना परिवहन विभागाने दिले आहेत.

ऑनलाईन तक्रार करण्याची सुविधा

वितरकांकडून अतिरिक्त रक्कम वसूल केली जात असल्यास संबंधित प्रादेशिक, उप प्रादेशिक परिवहन यांचेकडे लेखी, समक्ष, टपालाद्वारे शिवाय ई-मेलद्वारे किंवा http://transportcomplaints.mahaonline.gov.in या पोर्टलवर तक्रार दाखल करावी. आवश्यकता भासल्यास ग्राहक संरक्षण मंचाशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असा फलक शो-रुममधील दर्शनी भागामध्ये प्रदर्शित करण्याबाबत वितरकांना सूचना दिल्या आहे.

“वाहनांचा नोंदणी शुल्क, कर घेण्यासंदर्भात आता वितरकांना सूचना दिल्या आहे; तर तशी पाटीसुद्धा दर्शनी भागात लावावी लागणार आहे. त्यामुळे अतिरिक्त शुल्काच्या आकारणीपासून सर्वसामान्यांची सुटका होणार आहे.”
– भरत कळसकर, आरटीओ, ताडदेव.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here