
२७ नोव्हेंबर २०२१
पुणे : पुणे जिल्ह्यात शनिवारी (ता. २७) दिवसभरात २०८ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. याउलट दिवसात २५१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. अन्य चार जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण मृत्यूमध्ये पुणे शहर आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील प्रत्येकी दोन मृत्यूचा समावेश आहे. दिवसभरात पिंपरी चिंचवड, नगरपालिका आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.
जिल्ह्यातील दिवसातील एकूण कोरोना रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ९४ रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये ३५, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ६५, नगरपालिका आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात प्रत्येकी सात नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
हेही वाचा: Corona Update : राज्यात 889 नवीन रुग्ण तर 17 रुग्णांचा मृत्यू
दिवसातील एकूण कोरोनामुक्तांमध्येही पुणे शहरातील सर्वाधिक १०४ जण आहेत. पिंपरी चिंचवडमधील ४१, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ८०, पिंपरी चिंचवडमधील ४१, नगरपालिका हद्दीतील २१ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील पाच जण कोरोनामुक्त झाले आहेत. सद्यःस्थितीत पुणे जिल्ह्यात एकूण २ हजार २९ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. एकूण सक्रिय रुग्णांपैकी सहर व जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत मिळून ६८७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. उर्वरित १ हजार ३४२ जण हे गृह विलगीकरणात आहेत.
Esakal