
Mann Ki Baat: नवा व्हेरियंट, कृषी कायदे; PM मोदी करणार उद्या देशाला संबोधित
२७ नोव्हेंबर २०२१
नवी दिल्ली : जगभरात ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंटमुळं पुन्हा भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर उद्या, २८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान आपल्या मन की बात या कार्यक्रमातून देशाला संबोधित करणार आहेत. त्यामुळं PM मोदी नक्की काय संदेश देतील याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे. ऑल इंडिया रेडिओ, डीडी आणि नरेंद्र मोदी अॅपवर हा कार्यक्रम ऐकता येणार आहे.
गेल्या महिन्याभरात घडलेल्या घटनांचा आढावा पंतप्रधान आपल्या मन की बात या कार्यक्रमातून घेतली. नागरिकांशी संवादाच्या स्वरुपात होणाऱ्या या कार्यक्रमात पंतप्रधान पुन्हा एकदा अद्वितीय कामगिरी करणाऱ्या देशातील व्यक्तींशी संवाद साधतील. तसेच अफ्रिकेत आढळून आलेल्या नव्या व्हेरियंटबाबत काही महत्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे.
Esakal