
अजित पवारांची तोफ वेल्ह्यात धडाडणार; मंगळवारी उपमुख्यमंत्री वेल्ह्यात
२७ नोव्हेंबर २०२१
वेल्हे, (पुणे) – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंगळवार (ता. ३०) रोजी वेल्ह्यात येणार असल्याचे निश्चित झाले आहे काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नुकत्याच झालेल्या जोरदार सभेमुळे कॉंग्रेसमय झालेले वातावरण व त्या पार्श्वभूमीवर वेल्हे राष्ट्रवादीकडून अजित पवारांनी सभा त्यामुळे वेल्हे तालुक्यातील राजकारण चांगलेच तापले असून अजितदादा काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अजित पवारांची वेल्हेत होणारी सभा दोन वेळा काही कारणास्तव पुढे ढकलल्याने काही दिवसांपासून वेल्हेकरांची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. त्यातच वेल्हे तालुक्यातील बहुचर्चित काँग्रेस, भाजपा, व मनसेतील अनेकांचे रखडले प्रवेश व तालुकास्तरीय राष्ट्रवादी पक्षातील काही नियुक्त्या अजित पवारांच्या सभेत होणार आहेत. तोरणा किल्लाच्या पायथ्याशी असलेल्या मेंगाईदेवी मंदिराच्या प्रांगणात ज्या ठिकाणी काँग्रेसची सभा झाली त्याठिकाणीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजित पवारांनी सभा आयोजित केली असून मंडप उभारणी कामास तात्काळ सुरवात झाली आहे.
हेही वाचा: नवीन वर्षापासून बांधकाम परवानगी ऑनलाईन; एकनाथ शिंदेंची घोषणा
वेल्हे तालुक्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये विकास कामांचा श्रेयवाद शिगेला पोहचला आहे त्यातच वेल्हेमधील कोणत्या विकास कामांचे भूमिपूजन व उदघाटने करणार असल्याचे अद्यापही गुलदस्त्यातच आहे.
वेल्हे पंचायत समितीवर काँग्रेसची एकहाती सत्ता असून जिल्हा परिषदेचे दोन्ही सदस्य काँग्रेसचे आहेत त्यामुळे नाना पटोले यांची सभेस मोठी गर्दी जमवून यशस्वी करण्यास काँगेसला यश आले होते तर गेली दहा वर्षपासून वेल्हेमध्ये राष्ट्रवादी सत्तेपासून दूर असून अजित पवारांच्या सभेच्या तयारीसाठी अवघे दोन दिवस मिळाले आहेत तर राष्ट्रवादीच्या अंतर्गत कलहामूळे ही सभा यशस्वी होते का, राष्ट्रवादीच्या स्थानिक नेते गर्दी जमविण्यास यशस्वी होतात का यावर आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूकमध्ये राष्ट्रवादीचे भवितव्य अवलंबून असल्याची जोरदार चर्चा तालुक्यात रंगली आहे.
Esakal