ई-शिखर
sakal_logo

द्वारे

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : राज्यातील पहिल्याच ई- पीकपाहणी प्रकल्पाचा पहिला टप्पा राज्य शासनाने पूर्ण केला आहे. राज्यातील ५८ लाख शेतकऱ्यांनी ७० लाख हेक्टरवरील ३८४ पिकांची ई- पीकपाहणी केली. या पाहणीत जळगाव जिल्ह्याने राज्यात आघाडी घेत पहिला क्रमांक मिळविला आहे. जळगाव जिल्ह्यात चार लाख ८९ लाख हेक्टरवरील पिकांची ई- पीकपाहणी झाली आहे. तीन लाख ६४ हजार खातेदारांनी ई- पीकपाहणी नोंदविली आहे.

ई- पीकपाहणी प्रकल्पात ‘माझा शेतकरी माझा सातबारा- मीच नोंदविणार माझा पीकपेरा’ अशी संकल्पना मांडण्यात आली होती. आपल्याच शेतातील पिकांच्या ऑनलाइन नोंदणीसाठी जिल्हास्तरावर प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. त्यात तलाठ्यांना प्रशिक्षित करण्यात आले. त्यांनी गावोगावी जाऊन ई- पीक नोंदणीबाबत ग्रामसेवक, पोलिसपाटील, ग्रामस्थ, प्रगतीशिल शेतकरी, शेतकरी, युवावर्गाला प्रशिक्षित केले. मोबाईलचा अधिकाधिक उपयोग करणाऱ्या युवक, शेतकरी यांनी टेक्नोसेव्ही होत ई- पीकपाहणीत आपल्या पिकांची नोंदणी केली व इतरांच्या पिकांची नोंदणी करण्यास मदत केली.

हेही वाचा: Corona Update : राज्यात 889 नवीन रुग्ण तर 17 रुग्णांचा मृत्यू

सोबतच महसूल कर्मचाऱ्यांनी मदत केल्याने जिल्ह्यात सर्वाधिक ई- पीकपाहणी करून नोंदणी झाली. जिल्ह्यात सर्वांत जास्त पिकांची नोंदणी कापूस पिकांची तीन लाख २७ हजार ८३ हेक्टर झाली. द्वितीय नोंदणी मका पिकांची २५ हजार १२० हेक्टर, तृतीय नोंदणी सोयाबीन पिकांची २० हजार ४४ हेक्टरवरील झाली.

ई- पीकपाहणी संख्यात्मक अशी…

  • एकूण ७/१२–१२ लाख १८ हजार ९२७

  • एकूण खातेदार संख्या–१३ लाख ६७ हजार २०३

  • एकूण बिनशेती खातेदार- सहा लाख ३४ हजार ९१९

  • एकूण शेती खातेदार- सात लाख ३२ हजार २८४

  • ई-पीकपाहणी नोंदणी अंतर्गत खातेदार- तीन लाख ६४ हजार ७२४

  • ई-पीकपाहणीत नोंदविलेली पीकपाहणी- चार लाख ८९ हजार ६९१ हेक्टर

  • नोंदविलेली पीकसंख्या- ३२४

“ई- पीकपाहणीत राज्यात जळगाव जिल्ह्याने सर्वाधिक पीकपाहणीची नोंद केली आहे. याची शेतकऱ्यांचा पीकविमा, कर्ज घेताना मदत होईल. शासनालाही कृषी धोरण ठरविताना कोणत्या पिकांकडे शेतकऱ्यांचा कल आहे, हे लक्षात येईल. ई- पीकनोंदणी जिल्हाधिकारी अभजित राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल कर्मचारी, शेतकऱ्यांनी केली आहे.”

– शुभांगी भारदे, महसूल, उपजिल्हाधिकारी



Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here