गुन्हा

कुर्ला परिसरात 26 नोव्हेंबरला डिएचआयएल कंपाऊंडमध्ये एका 20 वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला होता.

sakal_logo

द्वारे

टीम ई सकाळ

मुंबई – कुर्ल्यातील डीएचआयएल कंपाउंडमध्ये एका २० वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडला होता. २६ नोव्हेंबरला मृतदेह सापडल्यानंतर २४ तासांच्या आताच पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. प्रेम संबंधातून हा खून झाल्याची माहिती आता समोर येत आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, कुर्ला परिसरात 26 नोव्हेंबरला डिएचआयएल कंपाऊंडमध्ये एका 20 वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी काही तासांतच तपास करुन दोन आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्यांची नावे रेहान शेख आणि फैजल अशी आहेत. रेहानचे मृत मुलीसोबत प्रेम संबंध होते. त्यातूनच मुलीची हत्या झाल्याचं समोर आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेहानचे मृत मुलीसोबत प्रेम संबंध होते. मुलगी लग्नासाठी मागे लागली होती, मात्र रेहानला लग्न करायचे नव्हते. रेहान आणि फैजल दोघंही तिला समजावून सांगण्यासाठी इमारतीच्या टेरेसवर घेऊन गेले होते. पण मुलगी तिच्या मागणीवर ठाम होती. त्यामुळं त्यांनी तिला मारल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आले. दोघंही शिकत असल्याची माहीती आहे.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here