
5 तासांपूर्वी
दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवीन व्हेरीयंट (Corona New Variant) आढळला आहे. या विषाणूला ओमीक्रोन (Omicron Corona Variant) हे नाव देण्यात आले आहे. शेजारच्या कर्नाटक राज्यात दक्षिण आफ्रिकेतून आलेले दोन कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. परिणामी कोरोनाचे संकट पुन्हा वाढू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. यामुळे महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये जाणाऱ्यांसाठी पुन्हा आरटीपीसीआर टेस्टची सक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, राज्यसीमेवर असेलेल्या कोगनोळी टोल नाक्यावर वाहने अडवली जात आहेत. महाराष्ट्रातून किंवा अन्य ठिकाणांहून कर्नाटकात येणाऱ्यांची आरटीपीसीआर टेस्ट केली जात आहे. कर्नाटकात बंगरुळू येथील दोनजण आफ्रीकेतून आलेल्यांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर प्रशासन सतर्क झाले असून त्यांनी ही चाचपणी सुरु केली आहे. मात्र अचानक सुरु केलेल्या या टेस्टींगमुळे प्रवाशांची मात्र गैरसोय होत आहे. त्यामुळे अनेकजण रस्त्यातत अडकले आहेत.
हेही वाचा: नव्या व्हेरीयंटची भीती, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक
Esakal