
अभिनेत्री काजोलच्या बहिणीला कोरोनाची लागण
5 तासांपूर्वी
मुंबई – ज्या अभिनेत्रीनं आपल्या अदाकारीनं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. त्यांची पसंती मिळवली ती काजोल नेहमीच चाहत्यांच्या गप्पांचा विषय असतो. तिच्या चित्रपटांची जादू अजूनही कायम आहे. सोशल मीडियावर काजोल चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वी तिचा एक चित्रपट आला होता. त्यामध्ये ती तिच्या बहिणीसमवेत दिसली होती. आता गंभीर बातमी समोर आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या माहितीनुसार सध्या ती होम आयसोलेशनमध्ये असल्याचे सांगण्यात आले आहे.
काजोलची बहिण तनीषा मुखर्जीला कोरोना झाला आहे. तिनं सोशल मीडियावर त्यासंबंधी पोस्ट शेयर करुन माहिती दिली आहे. त्यामुळे त्यांनी स्वताला होम क्वॉरनटाईन करुन घेतलं आहे. तनिषाला जरी काजोल एवढं फेम मिळालं नसलं तरी काही चित्रपटांमध्ये ती झळकली आहे. यापूर्वी तिनं मनोरंजन क्षेत्रातील सर्वाधिक लोकप्रिय मालिका बिग बॉसमध्येही तिचा सहभाग होता. त्यावेळी तिला चाहत्यांची पसंती मिळाली होती. गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रेटींना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. यापूर्वी प्रसिद्ध अभिनेते कमल हासन यांना कोरोना झाला होता. त्यानंतर उर्मिला मातोंडकर यांनाही कोरोनाची लागण झाली होती.

तनीषानं सोशल मीडियावर कोरोना संक्रमित झाल्याची माहिती देताना लिहिलं आहे की, सर्वांना नमस्कार, मी कोरोना संक्रमित झाले आहे. त्यासाठी मी स्वत काही दिवस होम आयसोलेशन मध्ये राहणार असल्याचे सांगितलं आहे. तनिषा अशा सेलिब्रेटींपैकी आहे ज्यांनी कोरोना महामारीच्या वेळेस कामाला सुरुवात केली होती. याच वर्षी लखनऊमध्ये एका चित्रपटाच्या शुटींगमध्ये ती व्यस्त होती.
Esakal