३० नोव्हेंबरपूर्वी 'ही' कामे करणं महत्त्वाचं आहे, नाहीतर आर्थिक अडचण निर्माण होऊ शकते.

या महिनाअखेर पर्यंत काही महत्त्वाची आर्थिक कामं करणं क्रमप्राप्त आहे.

sakal_logo

द्वारे

टीम ई सकाळ

या महिनाअखेर पर्यंत काही महत्त्वाची आर्थिक कामं करणं क्रमप्राप्त आहे. एलआयसी हाऊसिंगच्या गृहकर्ज ऑफर, पेन्शनसाठीचे जीवन प्रमाणपत्र आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधीशी (UAN) संबंधित काही कामं ३० नोव्हेंबरपर्यंत करणं गरजेचं आहेत. तसे न केल्यास तुम्हाला आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागू शकते आणि तुमचे पैसेही अडकू शकतात. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याचे उरलेले तीन दिवस सर्व वयोगटातील लोकांसाठी महत्त्वाचे आहे. महत्त्वाचं म्हणजे आज जरी रविवार असला, तरीही ही कामं ऑनलाईन करायची असल्यामुळे तुम्ही ती आजही करू शकता.

हेही वाचा: तुमच्या एलआयसी पॉलिसीची सद्य:स्थिती काय आहे? आता जाणून घ्या घरबसल्या एका क्‍लिकवर

पेन्शनधारकांनी जीवन प्रमाणपत्र लवकरात लवकर सादर करावे-

पेन्शनधारकांना दरवर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते. याद्वारे संस्था पेन्शनधारक हयात असल्याची खात्री करतात. जर तुम्ही पेन्शनधारक असाल आणि अजूनही तुम्ही जीवन प्रमाणपत्र सादर केले नसेल, तर हे काम ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा, अन्यथा तुमची पेन्शन थांबू शकते. याशिवाय कर्मचारी पेन्शन योजनेशी (EPS) संबंधित निवृत्तीवेतनधारक वर्षातून एकदा त्यांचे जीवन प्रमाणपत्र ऑनलाइन सबमिट करू शकतात. सोप्या शब्दात समजून घ्यायचे झाले तर, जर तुम्ही जानेवारी २०२१ मध्ये जीवन प्रमाणपत्र सादर केले असेल, तर आता ते सादर करण्याची गरज नाही.

हेही वाचा: पोस्ट देणार गृहकर्ज, LIC हाऊसिंग फायनान्ससोबत केला करार

परवडणाऱ्या व्याजदरातील गृहकर्जासाठी अर्ज करा-

भारतीय आयुर्विमा महामंडळाचे LIC हाऊसिंग फायनान्स २ कोटी रुपयांपर्यंतच्या गृहकर्जासाठी ६.६६ टक्के सवलतीचा व्याजदर देत आहे. त्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२१ आहे. तुम्हालाही एलआयसी हाऊसिंगकडून स्वस्त दरात गृहकर्ज घ्यायचे असेल, तर दोन दिवसांत अर्ज करा. हा दर CIBIL स्कोअर ७०० किंवा त्याहून अधिक असलेल्या सर्व कर्जदारांना लागू आहे, मग त्यांचा व्यवसाय कोणताही असो. याशिवाय कंपनी प्रोसेसिंग फीमध्येही सूट देत आहे.

पॅनकार्ड आधारकार्डला लिंक करा-

तुम्ही जर तुमचे पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक केले नसेल तर लवकरात लवकर लिंक करून घ्या. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) युनिक खाते क्रमांक आणि आधार (UAN-Aadhaar Link) लिंक करण्याची मुदत ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ती ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत होती. EPFO वेबसाइट, UMANG अॅप, EPFO ​​च्या e-KYC पोर्टलद्वारे OTP पडताळणी आणि बायोमेट्रिक क्रेडेन्शियल्सद्वारे आधार UAN शी लिंक केले जाऊ शकते. याशिवाय तुम्ही EPFO ​​कार्यालयात जाऊन देखील हे काम सोडवू शकता.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here