
5 तासांपूर्वी
मुंबई : मोदी सरकारने लादलेल्या कृषी कायद्याविरोधात देशभरात चाललेल्या शेतकरी आंदोलन वर्षपूर्ती निमित्त मुंबईतील आझाद मैदानात संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाने शेतकरी कामगार महापंचायत आयोजित करण्यात आली आहे. त्यामध्ये आज देशातील शेतकरी नेत्यांचा महात्मा फुले यांची पगडी देऊन सत्कार करण्यात आला.
महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ लिहून देशातील शेतकऱ्यांची व्यथा मांडली होती. आज त्यांचा स्मृतिदिन आहे, त्याचा दिनानिमित्त मुंबईत शेतकरी नेते राकेश टीकेत, यांच्यासह योगेंद्र यादव, अतुलकुमार अंजाम, तेजिंदर सिंह विर्क, युद्धविर सिंग, राजाराम सिंग, महिला शेतकरी नेत्या जजबिर नट, नर्मदा आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर, आदींचा यावेळी महात्मा फुले यांची पगडी देऊन सर्वाचा सत्कार करण्यात आला.
संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा महाराष्ट्र शेतकरी आंदोलनाच्या वर्षपूर्ती आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त मुंबईत आझाद मैदानात विराट शेतकरी कामगार महापंचायत आयोजित करण्यात आली असून त्यात देशभरातील शेतकरी कामगार नेते उपस्थित आहेत.
Esakal