
5 तासांपूर्वी
नवी दिल्ली : इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून पडून एका चार वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. नोएडाच्या (Noida) सेक्टर ७५ मधील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये बाळ बाल्कनीत खेळत असताना ही घटना घडली आहे.
हेही वाचा: 2 Years Of MVA : दोन वर्षांत दोन मंत्र्यांची विकेट, विदर्भावर काय परिणाम?
मुलाचे वडील दिल्लीच्या चांदनी चौकात दुकान चालवतात, तर आई गृहिणी आहे. सहा महिन्यांपूर्वीच हे कुटुंब डॅसनॅक सोसायटीच्या टॉवर बी मध्ये दहाव्या मजल्यावर राहायला आले होते. मुलगा शनिवारी बाल्कनीत खेळत होता. यावेळी त्याची आईदेखील सोबत होती. मात्र, आई पाच मिनिटांसाठी घरात गेली असता बाळ बाल्कनीतून खाली पडले. इमारतीमधील लोकांना आणि सुरक्षा रक्षकांना बाळ पडल्याचा आवाज आला. त्यामुळे त्यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली असता बाळ निपचित अवस्थेत पडले होते. आई परत बाल्कनीत आली असता बाळ नसल्याचे पाहून त्यांना धक्का बसला. त्यांनी शोध सुरू केला. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी फोन करून बाळ खाली पडल्याचे सांगितले. त्याला तातडीने निओ रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
निओ रुग्णालयाने पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली असून बाळाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. तसेच पुढील तपास सुरू आहे, असं पोलिसांनी सांगितलं.
Esakal