मुंबई
sakal_logo

द्वारे

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : तुटपुंजे वेतन आणि आर्थिक विवंचनेतून एसटी कर्मचाऱ्यांच्या आतापर्यंत सुमारे 40 आत्महत्या झाल्या आहे. त्यामुळे विलीनीकरणासाठी एसटी कर्मचार्यांनी टोकाची भूमिका घेत राज्यभरात संप पुकारला आहे. मात्र, परिवहन मंत्री अनिल परब यांनी या संपाला असंवेदनशीलपणे हातळल्याचा आरोप संघर्ष एसटी कामगार युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी केला आहे. त्यामुळे राज्य सरकारचे लक्षवेढण्यासाठी सोमवार पासून बेमुदत उपोषणाला सुरुवात करणार असल्याचे राव यांनी सांगितले.

संघर्ष एसटी कामगार युनियनने राज्य शासनाला वेळोवेळी एसटीच्या विलीनीकरणासाठी निवेदन दिले आहे. शिवाय गंभीर इशारे देऊनही शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी एसटी कर्मचार्यांनी संप पुकारला आहे. महामंडळाच्या भविष्यातील अस्तित्वासाठी विलिनीकरणाची मागणी करून तीव्र स्वरूपाचे आंदोलन सुरू आहे.

हेही वाचा: चौकशीच्या पत्राने एसटी कर्मचाऱ्यांत असंतोष; रुजू झाल्यानंतरही पत्र

त्याचा फायदा वेगवेगळ्या स्वयंघोषित नेतृत्वाने घेतला आहे. तर दुर्देवाची बाब 40 हून अधिक आत्महत्या होऊनही कर्मचाऱ्यांवर निलंबन आणि सेवामुक्तीची कारवाई केली जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात पुढाकार घेऊन एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक मार्ग काढावा, अशी मागणी शशांक राव यांनी केली आहे.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here