संजय राऊतांनी दिलं 'PM की शादी'चं आमंत्रण; लेकीची लग्नपत्रिका चर्चेत
sakal_logo

द्वारे

टीम ई सकाळ

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नाची सध्या राज्यभरात चर्चा आहे. राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत यांचा ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी विवाह होणार आहे. या लग्नसोहळ्यात राज्यातील बड्या हस्ती तसेच मोठे राजकारणी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 29 नोव्हेंबर रोजी हा लग्नसोहळा पार पडणार आहे. सध्या पूर्वशी-मल्हार यांचा हळदी समारंभ, संगीत कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर आले आहेत. पण सध्या मात्र राऊत यांच्या कन्येची लग्नपत्रिका सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या पत्रिकेवरील #PMkiShaadi (पीएम की शादी) हा हॅशटॅग सध्या चर्चेचा विषय ठरतोय.

हेही वाचा: Omicron Variant : मुख्यमंत्र्यांनी घेतली आढावा बैठक; दिला ‘हा’ इशारा!

मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या मुलीचं लग्न सध्या चर्चेचं कारण ठरलंय. आज संजय राऊत आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा डान्स चर्चेत आला आहे, तर दुसरीकडे हेच लग्न आणखी एका कारणासाठी चर्चेस पात्र ठरलंय. संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत हिचा ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी लग्न होणार आहे. त्यांचा या विवाहाला अर्थातच मोठे राजकारणी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. उद्या म्हणजेच 29 नोव्हेंबर रोजी हा विवाह पार पडणार आहे. मात्र, या विवाहाची आमंत्रण पत्रिका सध्या चर्चेचं कारण ठरलीय. याचं कारण आहे, की ही पत्रिका चक्क ‘पीएम’च्या लग्नाचं आमंत्रण देतीय.

हटके लग्नपत्रिकेची जोरदार चर्चा

उद्याच्या लग्न समारंभाआधी संगीत कार्यक्रम, हळदी समारंभ असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे नियोजित वधू आणि वर म्हणजेच पूर्वशी राऊत आणि मल्हार नार्वेकर यांच्या या लग्न समारंभाला अनेक बड्या व्यक्तींना आमंत्रण देण्यात आलं आहे. त्यासाठी छापण्यात आलेली ही लग्नपत्रिकाच सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. कारण या पत्रिकेच्या मुखपृष्ठावरील #PMkiShaadi (पीएम की शादी) असा हॅशटॅग टाकण्यात आला आहे.

#PMkiShaadi हॅशटॅग चर्चेत

या लग्न पत्रिकेमध्ये पूर्वशी आणि मल्हार यांचे इंग्रजीत नाव आहे. पूर्वशी (Purvashi) या इंग्रीजी नावातील पी (P) तसेच मल्हार (Mahlar) या नावातील एम (M) या अक्षरांना घेऊन एक खास हॅशटॅग तयार करण्यात आलाय. या दोन्ही नावांच्या आद्यक्षरांना घेऊन लग्नपत्रिकेवर #PMkiShaadi असं छापण्यात आलंय. हा हॅशटॅग सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. लग्नपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here