6 तासांपूर्वी
मुंबई : राज्य सरकारकडून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एसटी) कर्मचाऱ्यांना पगारवाढीची घोषणा करण्यात आली असली तरी एसटी कर्मचारी मात्र विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (माकप) नेते काॅ. नरसय्या आडम यांनी राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. एसटी कर्मचाऱ्यावर दडपशाही कराल तर महाराष्ट्र बंद करु; यांचा परिवहन मंत्री अनिल परब यांना इशारा दिला.तसेच आम्ही मोदींना वाकवले आहे, तुम्हाला वाकवायला किती वेळ लागणार आहे,असाही इशारा त्यांनी दिला.
संयुक्त शेतकरी किसान मोर्चा कडून आज आझाद मैदानात शेतकरी किसान महापंचायतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आडाम यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. सरकारने एस टी चे विलीनीकरण करण्यासाठी चालढकल करू नये, अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र करावे लागेल असाही इशारा आडाम यांनी सरकारला दिला.
9 नोव्हेंबर रोजी सोलापूर एसटी आगारातील कर्मचाऱ्यांच्या संपाच्या ठिकाणी जाऊन आडम मास्तर यांनी संपाला सक्रीय पाठिंबा जाहीर केला होता. भारतातील मार्क्सवादी व सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सचा (सिटू) महाराष्ट्र राज्य कमिटी एसटी आंदोलनात यापुढे सक्रीय सहभाग घेईल. तसेच प्रश्न निकाली न लागल्यास हजारो कामगार या आंदोलनात सहभागी होतील, असे आडाम यांनी म्हटले होते.
हेही वाचा: कर्मचाऱ्याने म्हटले, ‘हिंदी राष्ट्रीय भाषा’, झोमॅटोने मागितली ग्राहकाची माफी
या महापंचायतमध्ये देशभरातील शेतकरी नेत्यांनी मोदी सरकार विरोधात आपली भूमिका मांडताना शेतकऱ्यांना किमान हमी भाव मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच उत्तर प्रदेशसोबतच इतर राज्यातील निवडणुकांमध्ये भाजपाचा सूपडा साफ करण्यासाठी शेतकरी भूमिका बजावतील असा दावा केला.
Esakal