महिला अभियांत्रिकीसाठी प्रथम पारितोषिक
sakal_logo

द्वारे

यिन यंग टीम

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाने आयोजित केलेल्या नियतकालिक स्पर्धा २०१९-२० मध्ये भारती विद्यापीठ महिला अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या “Oyster” या नियतकालिकाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले तसेच शैक्षणिक वर्ष २०१८-१९ च्या स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. हा पुरस्कार प्राचार्य डॉ. एस.आर. पाटील, प्रा. यशोमती धुमाळ, प्रा. प्रणाली यावले व प्रा. कल्याणी चौधरी यांनी मा. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते व मा. प्र-कुलगुरू तसेच विद्यार्थी विकास मंडळाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत स्वीकारला. सक्रिय विद्यार्थिनी राजश्री पेंडे, कल्याणी पवार, प्रतीक्षा गायकवाड आणि रिद्धी चिंचवडे यांनी नियतकालिकेच्या कार्यात उल्लेखनीय काम केले.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here