विजयपूरजवळ भीषण अपघात; नांदणीच्या माजी सरपंचासह चौघांचा मृत्यू

विजयपूरजवळ भीषण अपघात; नांदणीच्या माजी सरपंचासह चौघांचा मृत्यू

sakal_logo

द्वारे

श्याम जोशी

दक्षिण सोलापूर : कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाची बस आणि फॉर्च्युनर गाडीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात नांदणीचे माजी सरपंच चिदानंद सुरवसे यांच्यासह चौघांचा मृत्यू झाला. हि घटना आज (ता.28) विजयपूर पासून 14 किलोमीटर अंतरावर घडली.

हेही वाचा: दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह; महापालिका सतर्क

या अपघातात सुरवसे यांच्यासह अन्य तीन जणांचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त आहे. अन्य तीन जणांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. यामध्ये एक जण वाहन चालक असून हा राजूर (ता.दक्षिण सोलापूर) येथील असल्याचे समजते. तर इतर दोघे तेरामैल येथील असून एकाचे नाव संदीप विठ्ठल पवार असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा: संजय राऊतांनी दिलं ‘PM की शादी’चं आमंत्रण; लेकीची लग्नपत्रिका चर्चेत

ही घटना कर्नाटक राज्यातील विजयपूर जिल्ह्यातील बसवकल्याणच्या जवळपास घडली. मृत चिदानंद सुरवसे (वय 47) यांची फॉर्च्युनर गाडी एम एच 13 सी एस 3330 ही कर्नाटक राज्यातील एसटी क्रमांक के ए 22 एफ 2198 ला धडकली. त्यानंतर उलटून तिचा चक्काचूर झाला.या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चारही मृतदेह विजयपूर मधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणले. घटनेची माहिती मिळताच चिदानंद सुरवसे यांचे कुटुंबीय विजयपूर कडे रवाना झाले आहेत. चिदानंद सुरवसे हे दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील कॉंग्रेसचे कार्यकर्ते असून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे कट्टर समर्थक होते. नांदणीचे ते अनेक वर्षे सरपंच होते.



Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here