
२८ नोव्हेंबर २०२१
हडपसर : पती-पत्नी दुचाकी वरून घरी जात असताना डंपरने धडक दिल्याने पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर पती जखमी झाला आहे. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दरम्यान ट्रकचालक पळून जात असताना एका तरूणांनी पाठलाग करून त्याला पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना रोड पंधरा नंबर येथे टेकवडे पेट्रोल पंपासमोर सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडली.
हेही वाचा: दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह; महापालिका सतर्क
मंजिरी रमाकांत कपले ( वय ५५ रा.मांजरी ग्रीन वुड सोसायटी, मांजरी ) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. प्रा. रमाकांत दिनकर कपले ( वय ६० रा.मांजरी) असे जखमी इसमाचे नाव आहे. ट्रक चालक ज्ञानेश्वर बबन शेलार ( वय २७ रा. बार्शी) याला पोलिसांनी अटक केली आहे.
हेही वाचा: संजय राऊतांनी दिलं ‘PM की शादी’चं आमंत्रण; लेकीची लग्नपत्रिका चर्चेत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कपले दांपत्य हे हडपसरहून दुचाकीवरून पुणे सोलापूर रोड मार्गे घरी जात होते. ते टेकवडे पेट्रोल पंपा समोर आले असता मालवाहू ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकी खाली पडली. दुचाकीचालक कपले एका बाजूला पडले तर, त्यांची पत्नी मंजिरी यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीचालक रमाकांत कपले हे किरकोळ जखमी झाले आहेत. नागरिकांनी जखमी कपले यांना रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान ट्रक चालक पळून जात असताना तेथील काही युवकांनी त्याचा पाठलाग करून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.
Esakal