
भिवंडीत लग्नमंडपात फटाके फोडणे भोवले; आग लागल्याने २५ दुचाकी खाक
२९ नोव्हेंबर २०२१
भिवंडी : भिवंडी शहराजवळ असलेल्या खंडूपाडा भागातीलअंसारी मॅरेज हॉल परिसरात फटाके फोडणे चांगलेच भोवले आहे. फटाक्यांमुळे लग्न मंडपाला लागलेल्या आगीत जवळपास 20 ते 25 दुचाकी खाक झाल्याची घटना रविवारी रात्री उशिरा घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाने जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
हेही वाचा: दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह; महापालिका सतर्क
अन्सारी मॅरेज हॉलमध्ये रविवारी रात्री लग्नसमारंभ सुरू होता. यादरम्यान पार्किंगच्या मोकळ्या जागेत फटाके फोडण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी करताना अचानक मंडपाला आग लागली. हळूहळू ही आग पसरून पार्किंगमधील वाहनांना लागली. या आगीत सुमारे २० ते २५ दुचाकी जळून खाक झाल्याचे समजते आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली आहे.
Esakal